विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांचा आठवड्याच्या अखेरिस दौरा करून पुढील सोमवारी मदतीसंदर्भात विधीमंडळात घोषणा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिले.
विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि तेथील शेतकऱयांची कर्जे माफ करण्याची मागणी विदर्भातील आमदारांनी सोमवारी विधीमंडळात केली. त्यावर चव्हाण यांनी निवेदन केले. या आठवड्याच्या अखेरिस स्वतः विदर्भाचा दौरा करून तेथील परिस्थितीची पाहणी करेन. त्यानंतर पुढील सोमवारी मदतीसंदर्भात विधीमंडळात सरकारतर्फे मदतीची घोषणा केली जाईल, असे त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले.
विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा मुख्यमंत्री दौरा करणार
विदर्भातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांचा आठवड्याच्या अखेरिस दौरा करून पुढील सोमवारी मदतीसंदर्भात विधीमंडळात घोषणा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिले.
First published on: 22-07-2013 at 02:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will take review of situation in vidarbha by end of this week says prithviraj chavan