सावंतवाडी : मंत्रिपदांमुळे महाराष्ट्रात फिरलो, पण पुढील काळात कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायला आवडेल. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे कोकणची जबाबदारी द्या म्हणून मागणी करणार आहे, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

केसरकर म्हणाले, सिंधुरत्न योजना, पर्यटन यामधून कोकणच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मी राबवत आहे. त्यासाठी संकल्पना केली आहे. पर्यटन धर्तीवर १५० हाॅटेल उभारण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून मंजुरी दिली आहे. त्यासाठी हाॅटेलचे माॅडेल निश्चित केले आहे. प्रत्यक्षात सर्वांगीण विकास, महिलांना रोजगार, रेशीम उद्योग अशा विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. ते आणि पर्यटन विकास काम कोकणात करण्यासाठी पुढाकार घेता येईल.

हेही वाचा – Satyapal Malik: विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका

हेही वाचा – मालवण येथील कार्यक्रम नौदलाचा, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून साडेपाच कोटींचा खर्च का केला? – आमदार वैभव नाईक

केसरकर म्हणाले, शिक्षण मंत्री झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात जशी मी क्रांती केली. तसेच कोकणात पर्यटन व निसर्ग अबाधित ठेवून मला काम करायचे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वेगळी कमिटी स्थापन केली आहे. निसर्ग आणि पर्यटन डोळ्यासमोर ठेवून रोल मॉडेल तयार करण्यात आले आहे. त्याचा फायदा तळागाळातील लोकांना होणार आहे.