अवघ्या १० दिवसांपूर्वी अर्थात ३० जून रोजी राज्यात ७ आयएएस अर्थात वरीष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक मोठी नावं होतं. त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा राज्य सरकारने राज्यातील ७ वरीष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. पुण्यात प्रवासी बसेसची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या पीएमपीएमएल अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला या बदल्यांनंतर नवे व्यवस्थापकीय संचालक मिळाले आहेत. २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावरून बदली करून त्यांच्यावर पीएमपीएमएलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच कोकण विभागाला देखील नवे विभागीय आयुक्त मिळाले आहेत.
कुणाची कुठे झाली बदली?
१) लक्ष्मीनारायण मिश्रा (२०१२) यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदावरून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर बदली करण्यात आली आहे.
२) व्ही. बी. पाटील (२०००) यांची अन्न व पुरवठा विभागातील सचिव पदावरून कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
३) विजय वाघमारे (२००४) यांची एमएसआरडीसी मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचाकल पदावरून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव पदी बदली करण्यात आली आहे.
४) श्रीमती विमला आर (२००९) यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
५) डॉ. राजेंद्र भारूड (२०१३) यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदावरून पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे.
६) जलाज शर्मा (२०१४) यांची नागपूरच्या अतिरिक्त पालिका आयुक्तपदावरून धुळ्याच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
७) श्रीमती मनिषा खत्री (२०१४) यांची नागपूरच्या आदिवासी विकास अतिरिक्त आयुक्त पदावरून नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.