प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित करण्याचा मोठा निर्णय LBSNAA अकादमीनं घेतला आहे. त्यानुसार २३ जुलैपूर्वी त्यांना अकादमीत हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पूजा खेडकर यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील वर्तन व त्यानंतर त्यांच्या कागदपत्रांमध्ये घोटाळा असल्याचे झालेले आरोप यासंदर्भात आता सखोल तपास चालू असून थेट पंतप्रधान कार्यालयाकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. एकीकडे हे सर्व प्रकरण चर्चेत आलेलं असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी मोठा आरोप केला आहे. हे सर्व प्रकरण म्हणजे त्यांच्याविरोधातील राजकीय कारस्थान असल्याचं ते म्हणाले आहेत.

याआधीही दिलीप खेडकर यांनी मुलीचा बाजू उचलून धरली असून पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोणतंही गैरवर्तन केलं नसल्याचा दावा केला होता. उलट, तेथील वरीष्ठांनीच आपल्या मुलीला चुकीची वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला. आता न्यूज १८ लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये दिलीप खेडकर यांनी या सगळ्या प्रकरणात थेट राजकीय कारस्थान असल्याचा दावा केला आहे. “सगळी शासनयंत्रणा दुसरं कुठलं काम नसल्यासारखी या प्रकरणात कामाला लागली, असं कसं झालं?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “शरद पवार अन् खर्गेंचा वाद…”
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
What Ajit Pawar Said About Saif Ali Khan
Ajit Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्याचा घटनाक्रम सांगत अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “नवा मुद्दा आला की..”
Dhananjay Munde
“महायुतीतील नेत्यांकडूनच माझ्याविरोधात…”, अजित पवारांसमोर धनंजय मुंडेंनी मांडली व्यथा; बीडमधील हत्या प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले…

काय म्हणाले दिलीप खेडकर?

यावेळी त्यांनी पूजा खेडकर यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वाद घालण्यासाठी गेल्याचा आरोप फेटाळून लावला. “मी फक्त तिची विचारपूस करण्यासाठी तिथे गेलो असताना माझा हस्तक्षेप असल्याचं म्हणणं चुकीचं आहे”, असं ते म्हणाले.

कोट्यवधींची मालमत्ता, तरी क्रिमीलेअर?

दरम्यान, दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवतेवेळी कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. पण त्यानंतरही पूजा खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून अर्ज दाखल केल्यावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावर दिलीप खेडकर यांनी त्यांची बाजू मांडली आहे. “जर या व्यवस्थेत पैशाचाच वापर झाला असता तर इथे एकही गरीब आला नसता. आता गरीब-श्रीमंताची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. ज्याचं ५ लाख उत्पन्न आहे, त्याच्यापेक्षा एक लाख उत्पन्नाचा माणूस गरीब असेल. शासनानं त्यात काही निकष ठरवले आहेत. नॉन क्रिमीलेअर नियमानुसारच काढलं आहे”, असा दावा त्यांनी केला.

“…तर मी उद्याच मुलीला राजीनामा द्यायला सांगतो”, IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांचं थेट आव्हान; म्हणाले, “हे सगळं…”

“कोट्यवधींचे आकडे दिले जात आहेत. पण त्यात वडिलोपार्जित मालमत्ता आली आहे. माझ्या प्रतित्रापत्रात वडिलोपार्जित मालमत्तेची माहिती आली आहे. ती खरेदी कितीला केली, हे तुम्ही पाहात नाहीत. पण आज त्या मालमत्तेची काय किंमत आहे त्याची बेरीज करून हा आकडा काढला जातोय. तीही बेरीज चुकीची आहे. हे आकडे वाढवून दाखवले जात आहेत. यासंदर्भात आता समिती नेमली आहे. ती समिती त्याचा तपास करणारच आहे. क्रिमीलेअर तुमच्या उत्पन्नावर लागू होतं. मालमत्तेवर नाही. एखाद्या गरीबाकडे ५ एकर जमीन असते. तिचा बाजारभाव काही कोटींमध्ये जातो. मग त्याला गरीब म्हणणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय कारस्थानाचा आरोप

दरम्यान, पूजा खेडकर प्रकरणामागे राजकीय कारस्थान असल्याचा थेट आरोप दिलीप खेडकर यांनी केला आहे. मात्र, यामागे नेमकं कोण आहे? यासंदर्भात त्यांनी भाष्य केलेलं नाही. “माझ्यावर राजकीय वरदहस्त असता, तर या प्रकरणात इतकं मीडिया ट्रायल झालंच नसतं. मी राजकीय बळी आहे. निवृत्तीनंतर आपण समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे या हेतूने काही प्रश्न घेऊन मी लोकसभेची निवडणूक लढवली होती. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माझं निवडणूक लढवणं माझ्या विरोधकांना पटलेलं नसू शकतं. त्याचा राग त्यांच्या मनात असू शकतो”, असा दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे.

IAS पूजा खेडकर यांच्यावर LBSNAA ची मोठी कारवाई; जारी केले ‘हे’ आदेश; राज्य सरकारनंही पाठवलं पत्र!

“विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही मी जाहीर केलं होतं. त्यामुळे मला कसं बदनाम करता येईल याचा विचार माझ्या विरोधकांचा होता. पण मुलांपर्यंत जाणं आणि त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणं हे दुर्दैवी आहे. सगळी शासकीय यंत्रणाच दुसरं काही काम नसल्यासारखी माझ्या मुलीच्या बाबतीत कामाला लागल्याचं दिसतंय”, असा थेट दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे.

Story img Loader