नगर : विविध कारणांनी चर्चेत असलेल्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा दिलीप खेडकर यांचे अपंगत्वाचेे प्रमाणपत्र नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातून देण्यात आले होते. तशा नोंदी (अभिलेख) जिल्हा सरकारी रुग्णालयात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले. याबाबत खातरजमा किंवा फेरपडताळणी करण्यासंदर्भात वरिष्ठ किंवा दिव्यांग आयुक्तांकडून कोणतेही आदेश नसल्याचेही डॉ. घोगरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> सांगली: झिका संसर्गित रुग्ण आढळल्याने महापालिकेची तपासणी मोहीम

Nashik, Parents allegation, custody of girl and boy Nashik, district hospital Nashik,
नाशिक : मुलगा झाल्याचे सांगून ताब्यात मुलगी, जिल्हा रुग्णालयातील प्रकार
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
A march to the collector office for various demands of tribals nashik
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Fake IAS officer arrested in Solapur
सोलापुरात तोतया आयएएस अधिकाऱ्यास अटक; नोकरीचे आमिष दाखवून गंडा
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा
Sassoon, Dean Sassoon, post of Dean, Dean,
‘ससून’मधील गोंधळानंतर राज्य सरकार सावध! वैद्यकीय अधीक्षकपदाचे निकष बदलण्याची पावले
thane zp school closed marathi news
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांच्या आंदोलनामुळे बंद, शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
Police can conduct medical examination in three more hospitals
आणखी तीन रुग्णालयांमध्ये पोलिसांना वैद्यकीय तपासणी करता येणार

पूजा खेडकर यांचे कुटुंबीय मूळचे भालगाव (ता. पाथर्डी, नगर) येथील. त्यांची आई मनोरमा यांनी भालगावच्या सरपंच म्हणून काम पाहिले आहे. तर वडील निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून निवडणूक लढवली. पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राबद्दल संशय व्यक्त केला जातो व त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला ते दिव्यांग प्रमाणपत्र नगरच्या सरकारी रुग्णालयातून देण्यात आले आहे. सन २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग व सन २०२० मध्ये मनोविकार प्रमाणपत्र देण्यात आले. या दोन्हींचे एकत्रित प्रमाणपत्र सन २०२१ मध्ये देण्यात आले. त्याबद्दल तत्कालीन वैद्याकीय मंडळाने तपासणी केली होती.

खेडकर यांच्या आई, वडिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदाटी केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मनोरमा दिलीप खेडकर, दिलीप खेडकर (दोघे रा. नॅशनल हौसिंग सोसायटी, बाणेर), अंबादास खेडकर (रा. आंबी, ता. हवेली) यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खेडकर यांच्याबरोबर शेतकऱ्यांना धमकाविण्यासाठी आलेल्या अंगरक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अंबर दिवा लावल्याबद्दल पूजा खेडकर यांच्या मोटारीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मनोरमा खेडकर यांनी अरेरावी केली होती. मनोरमा खेडकर यांनी धडवली गावात शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर शेतकरी पंढरीनाथ कोंडिबा पासलकर यांनी याबाबत पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.