Manorama Khedkar Arrested from Raigad : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. आज अखेर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती लॉज येथून त्यांना साडे पाच वाजता ताब्यात घेण्यात आले. पुणे ग्रामिण पोलीसांनी ही कारवाई केली.
रायगड जिल्यातील महाडमधून अटक
मनोरमा खेडकर यांच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांची तीन पथके त्यांचा शोध घेत होती. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील हिरकरणवाडीमधील पार्वती लॉजमध्ये त्या लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. तिथून त्यांना पुण्यात नेण्यात येत आहे. रायगड पोलीसांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. दरम्यान पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर अद्यापही फरार आहेत.
आयएएस पूजा खेडकर वादात सापडल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे दिसले. शिवाय, यावेळी मनोरमा यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षकदेखील होते. जमिनीच्या मालकीहक्कावरून वाद झाल्यानंतर मनोरमा खेडकर थेट हातात पिस्तुल घेऊन त्या शेतकऱ्यांना धमकावू लागल्या. त्यांच्या आयएएस मुलीचे वर्तन चर्चेचा विषय ठरल्यानंतर त्यांच्या आईच्या व्हिडीओमुळे आणखी टीका होऊ लागली होती.
पूजा खेडकर यांनी अंबर दिवा लावलेली ऑडी कार जप्त करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या पुण्यातील घरी गेले असता त्यांच्याशीही मनोरमा खेडकर या अरेरावीने बोलत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर हातात पिस्तुल घेतलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला. ही घटना घडली, तेव्हा यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा >> मनोरमा खेडकर यांच्याकडून पोलीस, मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी; आणखी एक चित्रफीत प्रसारित
मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल का दाखवले?
मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल का दाखवले याबाबतची पार्श्वभूमी त्यांचे पती दिलीप खेडकर यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितली. ते म्हणाले, “माझी पत्नी मनोरमा आमच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्या असता तिथे आठ-दहा लोकांनी पत्नीवर हल्ला केला. त्याबाबत एफआयआर दाखल केलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या दोन पिढ्याआधीच ती जमीन विकली गेली असून दोन तीन लोकांकडून ती आमच्यापर्यंत आली. त्यानंतरही हे शेतकरी आम्हाला तिथे जाण्यापासून अडवत आहेत. आम्हाला धमकावत आहेत.”
आणखी वाचा >> IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांचं मोठं विधान; या सर्व घडामोडींमागे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप; म्हणाले…
पिस्तुल कुणावरही रोखले नाही
मनोरमा खेडकर यानी स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाहेर काढले होते, त्यांनी पिस्तुल कुणावरही रोखून धरलेले नाही, असा बचाव दिलीप खेडकर यांनी केला. ते म्हणाले, “पोलिसांनी या प्रकरणात जरी गुन्हा दाखल केला असेल तरी त्यांना शेतकऱ्यांनी जी माहिती दिली, तीच जबाबात घ्यावी लागली. पण तपासाअंती सत्य समोर येईल. सदर पिस्तुलाचा परवाना मनोरमा यांच्या नावावरच आहे. त्यांनी स्वसंरक्षणासाठी ते पिस्तुल घेतले होते. त्यांनी पिस्तुल दाखवले असेल तरी त्यांनी ते कुणावरही रोखलेले नाही. फक्त स्वसंरक्षणासाठी ते हातात ठेवले होते. एकटी महिला दुर्गम भागात असलेल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी कशी जाईल? यासाठी तिथे अंगरक्षक आणि पिस्तुल घेऊन जावे लागते.”