प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची नुकतीच वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असताना त्यांनी नियम धाब्यावर बसून खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला, गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. वरिष्ठ अधिकारी मुंबईला गेले असताना त्यांचे दालन बळकावले होते. IAS अधिकारी प्रोबेशनवर असताना त्यांना फार सुविधा दिल्या जात नाही. तरीही पूजा खेडकर यांनी आपली सरबराई राखली जावी, यासाठी दबाव आणला होता. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी कामावर रुजू होण्याआधी सर्व व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. सदर संभाषणाचे चॅट आता व्हायरल होत आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्या अवाजवी मागण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार नोंदविली होती. यावेळी पूजा खेडकर आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्यामध्ये झालेले व्हॉट्सॲप चॅटचे तीन स्क्रिनशॉट जोडण्यात आले आहेत. या मेसेजमध्ये खेडकर संबंधित अधिकाऱ्याला त्यांच्या येण्याआधी सर्व व्यवस्था करून ठेवण्यास सांगत आहेत.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
UP CM Yogi Adityanath
Yogi Adityanath : ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देऊन योगी आदित्यनाथ यांनी काय साधलं?
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
mukkampost bombilwadi mazi ladki janta yojna
मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीची ‘लाडकी जनता योजना!’, पोस्ट होतेय व्हायरल, काय आहे ही योजना? वाचा…
Neelu Phule And Prasad Oak
“मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”

हे ही वाचा >> IAS Pooja Khedkar Property : पूजा खेडकर यांची डोळे दिपवणारी संपत्ती; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता, आलिशान गाड्या, सोन्याचे घड्याळ

व्हॉट्सॲपवर पूजा खेडकर काय म्हणाल्या?

पहिल्या संदेशात पूजा खेडकर स्वतःची ओळख करून देतात. “हेल्लो, मी आयएएस पूजा खेडकर. मी पुणे जिल्हाधकारी कार्यालयात प्रशिणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू होत आहे. डॉ. दिवसे सरांनी तुमचा नंबर दिला. मी ३ जून रोजी रुजू होत आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातून माझे काही कागदपत्र पाठवविले गेले आहेत, पण ते मला सापडत नाहीयेत. याबद्दल काय केले पाहिजे”, अशा स्वरुपाची मागणी त्यांनी केली.

यावेळी पलीकडील अधिकाऱ्याने सोमवारी कागदपत्रे शोधू, असे उत्तर दिले. त्यानंतर २३ मे रोजी पूजा खेडकर यांनी पुन्हा एकदा त्याच अधिकाऱ्याला मेसेज करून राहण्याची, प्रवासाची आणि बसायला केबिन वैगरेची चौकशी केली. मात्र अधिकाऱ्याने यावर कोणतेही उत्तर दिले नाही. यावर पूजा खेडकर यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मेसेज करून “याचे उत्तर द्या, हे महत्त्वाचे आहे”, असे सांगितले. तसेच पुन्हा एकदा मेसेज करत त्या म्हणाल्या, “मी रुजू होण्याआधी ही सर्व व्यवस्था झाली पाहिजे. त्यादृष्टीने मला नियोजन करायला. हे नंतरवर सोपवता येणार नाही.”

IAS Pooja Khedkar Wealth Pooja Khedkar property 17 crore
IAS पूजा खेडकर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. (Photo – Pooja Khedkar Instagram and X Viral Image)

याही मेसेजचे उत्तर न मिळाल्यामुळे पूजा खेडकर यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. मात्र फोन उचलला नाही, त्यामुळे खेडकर यांनी पुन्हा मेसेज करून फोन का उचलला नाही, काही अडचण आहे का? असा जाब विचारला. त्यानंतर चार दिवसांनी त्यांनी पुन्हा एकदा मेसेज करून गाडी आणि केबिनबाबत प्रश्न विचारला. ३ जूनच्या आधी याची व्यवस्था करून ठेवा, असेही सांगितले. जर तुमच्याकडून होत नसेल तर तसेही सांगा, म्हणजे मी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट बोलतो.

हे ही वाचा >> IAS पूजा खेडकरांचा भलताच रुबाब; वरीष्ठ अधिकाऱ्यांचं टेबल हटवलं, ऑडीला लाल दिवा लावल्याचा ‘कार’नामा समोर

जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्य सचिवांना दिलेल्या अहवालात खेडकर यांनी निवासस्थानाचीही मागणी केल्याचे सांगितले जाते.

स्वतंत्र केबीनसाठी वडिलांसह शोधाशोध

पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम या ४ जून रोजी मतमोजणीच्या प्रक्रियेत होत्या. कदम यांच्या केबीनमध्ये बसून खेडकर यांनी अनुभव घ्यावा असे त्यांना सांगण्यात आले. मात्र ही सूचनाही त्यांनी नाकारली आणि रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतंत्र कक्ष मागितला. पूजा खेडकर यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील चौथ्या मजल्यावरच्या कुळकायदा शाखेत बैठक व्यवस्था करुन देण्यात आली. मात्र त्यांनी बैठक व्यवस्था नाकारली. यानंतर पूजा खेडकर यांनी त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत हव्या असलेल्या केबीनचा शोध सुरु केला.

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या केबिनवर दावा सांगितला. अजय मोरेंनी अँटी चेंबरमध्ये बसण्यासाठी पूजा यांना संमती दिली होती. तरीही माझ्या मुलीला बसण्यासाठी स्वतंत्र जागा का नाही? ही इमारत कुणी बांधली आहे? प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था का करण्यात आली नाही असे प्रश्न उपस्थित केले.