कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इचलकरंजी येथील अप्पर सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात शिक्षा झालेल्या दोषीचं नाव सनी संजय कोळी (वय २७ रा. माणगांव) असं आहे. दोषीला १० वर्षे सश्रम कारावासाच्या शिक्षेसह ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माणगांव येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी ८ ऑगस्ट २०१९ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी माणगांव येथीलच सनी कोळी याला अटक करण्यात आली होती.

बलात्कार पीडित मुलीची साक्ष ग्राह्य, दोषीला शिक्षा

तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक प्रज्ञा चव्हाण यांच्या अहवालानुसार संशयित आरोपीने पीडित मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी इचलकरंजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्याची सुनावणी होऊन त्यामध्ये तीन साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पीडित मुलीची साक्ष ग्राह्य धरण्यात आली.

हेही वाचा : धक्कादायक! पेणमध्ये पोलिसाकडूनच विवाहित महिलेवर बलात्कार

सरकारी वकिल हेमंत मोहिते-पाटील यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला दोषी मानले. तसेच १० वर्षांचा तुरुंगवास आणि ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.