महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला २० ऑगस्ट रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. दाभोलकरांच्या स्मृतींना आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी शाखेने शहरात निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन केलं.

अंनिसने म्हटलं, “डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले असले, तरी अद्याप त्यांना शिक्षा झालेली नाही. कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनाचा तपासही खूप संथ गतीने सुरू आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे.”

“मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी व त्याच्याही पुढे जाऊन विवेकी पद्धतीने विचार मांडणाऱ्या विचारवंतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पोषक वातावरण समाजात राहिले पाहिजे. या उद्देशाने हा मॉर्निंग वॉक घेतला आहे,” अशी भूमिका अंनिसने मांडली.

हेही वाचा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकारणी जाहीर, अविनाश पाटील यांची राज्य अध्यक्षपदी निवड

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जनता चौक ते प्रांत कार्यालय चौक आणि पुन्हा शिवाजी पुतळा असा मॉर्निंग वॉकचा मार्ग होता. बजरंग लोणारी, सुनिल स्वामी, युसुफ तासगावे, रोहित दळवी आदी कार्यकर्त्यांनी यावेळी भावना व्यक केल्या. यावेळी महा. अंनिससह शहरातील विविध परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, सक्रिय कार्यकर्ते तसेच अन्य नागरिक उपस्थित होते.

Story img Loader