Uddhav Thackeray Reaction on Resignation of CM : गेल्यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक आमदार गेले. दरम्यान, राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले. बहुमत चाचणीसाठी लागणारा आमदारांचा आकडा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नसल्याने त्यांनी राजीनामा दिला. या राजीनामा सत्रामुळे उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूतीही मिळाली होती. मात्र, त्यांचा हाच निर्णय एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडला असून त्यांचं सरकार वाचलं आहे. यावरून, उद्धव ठाकरेंच्या राजीनामा निर्णयाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. यावरून त्यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज मुंबई दौऱ्यात आहेत. त्यांच्यासोबत आज त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा