२०२४ मध्ये महाविकास आघाडी होईल की नाही? हे आत्ताच कसं काय सांगू? असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी केलं होतं. त्यामुळे शरद पवार यांनी २०२४ ला सगळे पर्याय खुले ठेवले आहेत का? याची चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा संपते न संपतेच तोच आता नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं आहे की महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही त्याच दिशेने जात आहोत मात्र महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लान तयार आहे असं वक्तव्य आता नाना पटोले यांनी केलं आहे.

काय म्हटलं आहे नाना पटोलेंनी?

“आज निवडणूक होत नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? त्याबाबत चर्चा आत्ता करत नाही. निवडणूक झाल्यानंतर ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होईल. आमचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढण्याचा आहे. मात्र जर २०२४ ला महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लान तयार आहे. ” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
Sanjay Raut Ajit Pawar Gautam Adani
Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला

महाराष्ट्रातल्या लोकांनी चुकून भाजपाला १०५ आमदार निवडून दिले

महाराष्ट्रातल्या लोकांनी चुकून भाजपाला १०५ आमदार निवडून दिले. महाराष्ट्रात कधी नाही ती परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपाचे आमदार जास्त प्रमाणात निवडून दिले ही जनतेची चूक होती असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. टीव्ही नाईन मराठीशी संवाद साधत असताना नाना पटोलेंनी हे वक्तवय् केलं आहे. संख्या बळाच्या आधारे प्यादी चालवण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

राज्यातलं सरकार हे असंवैधानिक आहे . ३० जून २०२२ ते आजपर्यंत गंमतजंमत सरु आहे. खारघरचं प्रकरण भयंकर होतं. उन्हात तडफड होणाऱ्या लोकांना मारलं. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना होती. हे सरकार सीरियस नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. आता आपला प्लान काय आहे ते नाना पटोले यांनी म्हटलं आहे.