आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकारण तापलेलं आहे. भाजपाकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, तर महाविकास आघाडी मलिक राजीनामा देणार नसल्याचं सांगत आहे. याच दरम्यान भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचं खळबळजनक विधान केलं तसेच त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील अशा प्रकारची विधानं केली गेल्यामुळ मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघा राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
“शरद पवारच दाऊदचा माणूस…”, निलेश राणेंच्या ‘त्या’ विधानानंतर राणे बंधूंवर गुन्हा दाखल!
“मी केलेल्या वक्तव्यावरून माझ्या विरोधात आणि माझ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर महाविकासआघाडी आणि पवार यांचे दाऊद इब्राहिमवर इतकच प्रेम असेल तर त्यांनी त्यांच्या केबिनमधून गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा. आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पर्दाफाश केल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.” असं विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
“कदाचित नवाब मलिकच दाऊदचे फ्रंटमॅन…”, भाजपा नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा!
काय म्हणाले होते निलेश राणे?
निलेश राणे यांनी शरद पवारांचा संबंध थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता. शनिवारी केलेल्या वक्तव्यात ते म्हणाले होते, “मला संशय येतो की शरद पवारच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. खरंच संशय येतो. ज्यांनी व्यवहार केला, दाऊदच्या बहिणीला पैसे दिले, दाऊदच्या माणसांना पैसे दिले, बॉम्बब्लास्ट करणाऱ्या माणसांना पैसे दिले. अनिल देशमुखांनी काय केलं होतं? कसा झट की पट राजीनामा घेतला होता. विचार केला होता का? मग नवाब मलिक कोण आहे? ज्यांनी दाऊदशी व्यवहार केला. की अशी भीती आहे की नवाब मलिक खरं बोलले, तर शरद पवारांविषयी माहिती बाहेर येईल? असं काही आहे का?”