राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले, तर कोल्हापुरातून आपण लोकसभाही लढवू असे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसेच कोल्हापूर जिल्ह्य़ातील लोकसभा मतदार संघापैकी कोल्हापूर मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे असावा, अशी मागणी आम्ही केली असून यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेस की राष्ट्रवादीकडे याची जोरदार चर्चा सुरू असताना मुश्रीफ यांनी या मतदारसंघाची मागणी करतानाच निवडणूक लढविण्याची तयारीही दर्शवली आहे. या मतदारसंघात सध्या त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सदाशिवराव मंडलिक विद्यमान खासदार असून त्यांच्याकडूनही उमेदवारीची तयारी सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर मुश्रीफ यांनी वरील मत व्यक्त केले.

Story img Loader