राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सध्या लोणावळा दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं असून स्वतः शरद पवार यांनी आज मावळमधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. लोणावळ्यात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकून शरद पवार यांचं जंगी स्वागत केलं. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने शरद पवारांना हार घालण्यात आला. लक्षात ठेव माझं नाव शरद पवार आहे असा इशाराच शरद पवारांनी आपल्या भाषणात सुनील शेळकेंना दिला. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुनील शेळकेंना उद्देशून काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदाराने (मावळचे आमदार सुनील शेळके) आजच्या बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का? कोणी बोललं तर दमदाटी होते.

Sulbha Gaikwads candidacy announcement unsettled Shindes Shiv Sena amid BJP tensions
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांच्या पत्नीला, उमेदवारी दिल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण…
Accusation between BJP and Thackeray group over 37 acre plot Mumbai
भाजप, ठाकरे गट यांच्यात आरोपप्रत्यारोप; ३७ एकरच्या भूखंडावर शिवसेनेचा डोळा- शेलार
MLA Hiraman Khoskar, Political journey Hiraman Khoskar, Hiraman Khoskar marathi news,
पवार ते पवार असा आमदार हिरामण खोसकर यांचा राजकीय प्रवास
umesh patil
“मी अजितदादांवर नाराज नाही”, शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

तू आमदार कुणामुळे झालास?

इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“शरद पवार हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत. ५५ वर्षे त्यांची राजकीय कारकीर्द आहे. त्यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याने सुनील शेळके या आमदारांना धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. मी शरद पवारांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. पण त्यांनी याचा पुनर्विचार केला पाहिजे. ते आज कुठल्या स्तराला आहेत. अशा प्रकारे ते आमदारांना धमक्या देऊ लागले तर त्यांचा स्तर खाली येईल. मला वाटत नाही की कुणी आमदार शरद पवारांना धमकी देईल. मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही, तुम्ही जे सांगत आहात त्यावर मी इतकीच प्रतिक्रिया देतो आहे की असं त्यांनी बोलणं योग्य नाही.” असं देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं आहे.