समाजातील गुन्हेगारीच्या घटना रोखायच्या असतील आणि एखादा गुन्हेगार गुन्हा करत असेलतर त्याला पोलिसांनी डायरेक्ट शूट ॲट साईट करावे असे खळबळजनक विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. पुणे- बंगळुरु महार्गावरील कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या डीपी जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी सायंकाळी खासदार उदयनराजे भोसले यांनी चर्चा, नेमक्या कामाचा आढावा घेतला.
हेही वाचा >>> सातारा:युगपुरुषांच्या समाधी संवर्धनाबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावा- उदयनराजे
दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एक गोष्ट लक्षात घ्या की, कायद्यात भरपूर पळवाटा आहेत. उदाहरणार्थ १६ ते १८ वयाच्या आतील गुन्हेगार मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुन्हा केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात (रिमांडहोम) ठेवले जाते. नंतर ते त्याठिकाणाहून सुटतात. माझं तर एकच म्हणणं आहे की, एखाद्याला जर खलास करायचा असेल आणि त्यासाठी त्याचे जर डोके एवढं चालत असेलतर पुढे मागे बघायचे नाही डायरेक्ट शूट ॲट साईट करून टाकायचे. अन् जोपर्यंत समाजास असे उदाहरण दिले जात नाही तोपर्यंत अशा घटना चालतच राहणार आहेत.
हेही वाचा >>> सातारा: अजित पवार यांच्या आव्हानांना भीक घालत नाही; उदयनराजें
गुन्हेगारी कशी थांबवणार? कशा प्रकारे अत्याचाराच्या घटना थांबविणार? कारण वकील मंडळी भरपूर आहेत. उदाहरण द्यायचे झालेतर मी स्वतः एखादा गुन्हा केला की नंतर मी वकील देणार आणि बाकीचे जे आहेत की त्यांच्यावर सुद्धा अत्याचार झाला आहे. त्यांच्याकडे तेवढा पैसा नसल्याने ते पोलीस स्टेशनला जातात. त्या याठिकाणी गेल्यानंतर पोलिसच त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात. त्यांनाच आतमध्ये टाकतात, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.