मुंबईतील आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याच्या चौकशीचाच घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात अडकलेले सुशीलकुमार शिंदे हेच जर केंद्रीय गृहमंत्री असतील, तर या घोटाळ्याचा तपास कसा होणार, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी उपस्थित केला.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले,ह्वआदर्श घोटाळ्यात सुशीलकुमार श्िंादे यांच्यासह शिवाजीराव निलंगेकर, अशोक चव्हाण व दिवंगत विलासराव देशमुख यांचा सहभाग उघड झाला असून, त्याबाबतचा ठपका न्या. पाटील आयोगाने ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. हा चौकशी अहवाल नाकारत तसेच संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यास मान्यता देण्यास राज्यपालच नकार देत असतील तर ही जबाबदारी कोणाची, मुख्यमंत्र्यांची की राज्यपालांची, हे स्पष्ट व्हायला हवे.ह्व
आपण या घोटाळ्यासंदर्भात दोषींविरुद्ध कारवाई होण्यासाठी सीबीआय न्यायालयात याचिका दाखल करणाार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Story img Loader