Chandrkant Khaire: महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात जाहीर होऊ शकते. सगळ्याच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी २२५ ते २५० जागा लढवण्याची घोषणा सुरु केली आहे. त्याच प्रमाणे महाविकास आघाडी आणि महायुती यांनीही कंबर कसली आहे. अशात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे ( Chandrkant Khaire ) यांनी आपण आता विधानसभा निवडणूक लढणार आणि गद्दारांना हरवणार असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

“उद्धव ठाकरेंनी जर आदेश दिला तर मी विधानसभा लढवेन कारण मला गद्दारांना पाडायचं आहे. गद्दार या ठिकाणी माझ्यामुळे निवडून आले. कारण मी त्यांच्या मतदानासाठी प्रचार केला. जे फुटले त्याचं आम्हाला दुःख आहे. गद्दार सध्या नाटकं करत आहेत. आता जर गद्दारांना पाडायचं असेल तर मी नक्की निवडणूक लढवेन.” असं चंद्रकांत खैरेंनी ( Chandrkant Khaire ) म्हटलं आहे.

हे पण वाचा- “विधानसभेपूर्वी भूंकप होणार, चंद्रकांत खैरेंसह १० जण इच्छुक, मला चार जणांचे फोन आले”, भाजपा नेत्याचा मोठा दावा

लोकसभेला पैशांचा वापर करुन मला पाडण्यात आलं-खैरे

“१९९० मध्ये मी आमदार झालो, १९९५ मध्ये आमदार झालो. त्यानंतर मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिल्लीत पाठवलं. दिल्लीत मी २० वर्षे होतो. यावेळी या ठिकाणी धोका झाला. जे आत्ताचे गद्दार आहेत त्यांना पैशांची मस्ती आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये हेलिकॉप्टरने पैसे आले. पोलीस आयुक्तांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. लोकसभेला पैशांचा वापर करुन मला पाडण्यात आलं. हे सगळं असलं तरीही लोक चिडले आहेत. उद्धव ठाकरेंचं वलय, शरद पवारांचं वलय आहे त्यातून ही विधानसभेची जागा आम्ही जिंकू शकतो. कन्नड, विजापूर, गंगापूर या जागाही जिंकायच्या आहेत.” असंही चंद्रकांत खैरे ( Chandrkant Khaire ) म्हणाले. काही वेळापूर्वीच त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत खैरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

मला उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर विधानसभा निवडणूक नक्की लढवेन असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

मी गद्दाराला पाडण्यासाठी समर्थ आहे

संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजी नगर पश्चिम ही जागा तुम्ही लढवणार का? असं विचारलं असता चंद्रकांत खैरे ( Chandrkant Khaire ) म्हणाले, “मला जर उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर मी नक्की विधानसभा निवडणूक लढवेन. बाहेरच्या कुणाला तिकीट देण्याऐवजी आपला माणूस तिकडे नाही का? हे पाहिलं जाईल. मी एकनिष्ठ आहे आणि तो गद्दार आहे. एकनिष्ठ गद्दाराला पाडू शकतो. राजू शिंदे आमच्या पक्षात आले त्याबद्दल अंबादास दानवेंनी मला सांगितलं नाही. मी प्रवेश घेताना त्याला व्यासपीठावर पाहिलं. राजू शिंदेंनी मला पाडलं. जे उद्धव ठाकरेंना मनाला लागलं आहे. ही गोष्ट कुणी केली? राजू शिंदेंनी. मग अशा व्यक्तीला कोण निवडून देईल? ” असंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If uddhav thackeray orders me i will contest vidhansabha assembly election said chandrkant khaire scj
Show comments