महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमधील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. देशमुख कुटुंबियांकडून विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी तरुण नेते, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदमदेखील उपस्थित होते. विश्वजीत कदम यांचे वडील, काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम आणि विलासराव देशमुख यांची विधानसभेतील कारकिर्द एकाचवेळेस सुरू झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये घट्ट मैत्री होती, अशी आठवण विश्वजीत कदम यांनी करून दिली. तसेच विलासराव देशमुख हयात असते तर काँग्रेस पक्षाला फोडण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती, असेही कदम यांनी सांगितले. अशोक चव्हाण आणि इतर नेते काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा