राज ठाकरेंना त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेतील जे उघड करायचं आहे, ते त्यांनी करावं. आम्हाला कोणत्याही चर्चेचा तपशील उघड करायचा नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी मनसे महायुतीमध्ये येणार का, या विषयावरील चर्चा आता थांबवा; नाहीतर माझ्याशी केलेली चर्चा उघड करावी लागेल, या शब्दांत महायुतीतील घटक पक्षांना फटकारले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही मंगळवारी मुंबईमध्ये महायुतीत चौथ्या भिडूची गरज नाही. मनसेसोबत विशालयुतीचा विषय आता संपलाय, असे सांगून या विषयावर पडदा टाकला होता.
राज्यातील कॉंग्रेस सरकार घालवण्यासाठी काय करायला हवं, यावर आमची त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्या चर्चेतील राज ठाकरे यांना जे काही सांगायचं असेल, ते त्यांनी सांगावं. आम्हाला त्या चर्चेतील काहीही उघड करायचं नाही, असे फडणवीस म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2013 रोजी प्रकाशित
राज ठाकरेंना चर्चेतील जे उघड करायचंय, ते करू देत – देवेंद्र फडणवीस
राज ठाकरेंना त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेतील जे उघड करायचं आहे, ते त्यांनी करावं. आम्हाला कोणत्याही चर्चेचा तपशील उघड करायचा नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 26-06-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If wants raj thackeray can disclose our discussion with him says devendra fadnavis