भाजपा नेते किरीट सोमय्या हे दापोलीत दाखल झाले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यात यावे म्हणून सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. यावरुन आता अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले असून हिंमत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा असे आव्हान किरीट सोमय्या यांना दिले आहे.

हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले. मात्र शिवसेनेकडूनही किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल परब हे रिसॉर्ट माझं नाही असे सांगत आहेत. याबाबत ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे, असेही अनिल परब यांनी म्हटले आहे.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

“हे रिसॉर्ट माझा नाही. याबाबत चौकश्या झाल्या आहेत. वेगवेगळ्या यंत्रणांकडून सर्व कागदपत्रे तपासून झाली आहेत. हे रिसॉर्ट माझे नाही हे मी वारंवार सांगितले आहे आणि त्याबाबत कोर्टात याचिका दाखल केली आहे. किरीट सोमय्या हे माझे रिसॉर्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्यांनी कागदोपत्री सिद्ध करावे. किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का ते कारवाई करुन तोडण्यासाठी जाणार आहेत. एखादी अनाधिकृत गोष्ट असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा पालिकेला अधिकार आहे. किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. कोकणात काम करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत, त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे,” असे अनिल परब म्हणाले.

“कारवाई झाली नसेल तर ज्या संस्था हे काम पाहतात त्यांचेच हे काम आहे. किरीट सोमय्या त्या संस्थेचे कर्मचारी नाहीत. ते कसे बोलू शकतात मी तोडणार म्हणून आणि हिंमत असले तर त्यांनी तोडून दाखवावे. ते फक्त नौटंकी करत आहेत. मी तिथला पालकमंत्री असल्याने हॉटेलवाल्यांच्या व्यवसायवर आक्रमण करण्यात येत आहे. रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले नसेल तर त्यावर कारवाई होईल. पण त्याच्यासोबत माझे नाव जोडून वातावरण खराब करण्याचे काम सोमय्या करत आहेत,” असे अनिल परब म्हणाले.

“कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. माझा संबंध नसताना वारंवार आरोप करन प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हायकोर्टात जाणार आहे. कायदेशीर परवानगी घेऊन बांधकाम झाले असेल तर परवानगी ज्यांनी दिली त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी,” असेही अनिल परब म्हणाले.