लगतच्या आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून सुगंधी तंबाखू व गुटखा आणायचा आणि त्याची पूर्व विदर्भातील चार जिल्हय़ात जादा दराने विक्रीचा गोरखधंदा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. परराज्यातून आणलेला गुटखा व तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या अनिल राजकुमार पंजवानी, जितेंद्र प्रेमजीभाई ठक्कर व नूतन ठक्कर या तिघांच्या गोदामावर छापे मारून २० लाखाचा अवैध गुटखा जप्त केल्याने खळबळ उडाली. अवैध गुटखा विक्री करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार जिल्हय़ांना आंध्रप्रदेश व छत्तीसगडचा सीमावर्ती भाग लागू आहे. आज महाराष्ट्रात संपूर्ण गुटखा बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे छोटे मोठे पानठेले व टपऱ्याुवर गुटखा किंवा तंबाखू शोधून सुध्दा मिळत नाही. कारवाईच्या भीतीने सुध्दा हे छोटे दुकानदार गुटखा ठेवत नाहीत. मात्र गुटखा विक्रीच्या तस्करीत बडे व्यापारी गुंतले असल्याची माहिती अनिल पंजवानी, जितेंद्र व नूतन ठक्कर यांच्यावरील कारवाईतून समोर आली आहे. हे तिन्ही व्यापारी छत्तीसगड व आंध्र प्रदेशातून गुटखा व सुगंधित तंबाखू चोरटय़ा मार्गाने आणायचे आणि पूर्व विदड्टरातील शहरी आणि ग्रामीण ड्टाागात त्याची खुलेआम विक्री सुरू होती. येथील बागला चौकातील मुन्नालाल बागला यांच्या मालकीची गोदामे आहेत. यातील तीन गोदाम अनिल राजकुमार पंजवानी, जितेंद्र प्रेमजीभाई ठक्कर आणि नूतन प्रेमजीभाई ठक्कर यांनी भाडय़ाने घेतली होती. या तिघांच्याही गोदामातून सुगंधित तुबाखू आणि तत्सम पदार्थाची छुप्या मार्गाने विक्री केली जात होती. लगच्या आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून तंबाखू व गुटखा आणायचा आणि या तसेच गडचिरोली जिल्हय़ात जादा किंमतीने विक्री करण्याचा हा गोरखधंदा हे तीन तंबाखू तस्कर गेल्या अनेक दिवसांपासून करीत होते.
एकीकडे समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरायचे आणि दुसरीकडे तस्करीचा काळा धंदा करायचा असा या तिघांचा व्यवसाय होता. या गोदामातून सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विड्टाागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून या खात्याचे अधिकारी गोदाम व ठक्कर बंधू आणि पंजवानी या तिघांवर नजर ठेवून होते. दोन दिवसापूर्वीच या गोदामात वीस लाखाचा माल आल्याची माहिती मिळताच शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विड्टाागाच्या अधिकाऱ्यांनी ठक्कर व पंजवानी यांच्याा गोदामावर छापे टाकले. या तीन गोदामात मोठय़ा प्रमाणावर माल असल्याचे बघून अधिकारीही चक्रावून गेले. सुगंधित तंबाखू, मजा, गुटखा आणि अन्य तत्सम पदार्थाचे मोठे बॉक्स या गोदामात मिळाले. रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. यावेळी गोदामातून १९ लाख ५० हजाराचा माल जप्त करण्यात आला.
मोठे रॅकेट सक्रिय
या तिन्ही गोदामातील संपूर्ण गुटखा हा चंद्रपूर तालुक्यात वितरित केला जाता होता. तसेच शहरातील काही बडय़ा व्यापाऱ्यांना सुध्दा तंबाखू आणि तत्सम पदार्थाची विक्री करण्यात येत होती अशीही माहिती तपासात समोर आली आहे. ठक्कर बंधू व पंजवानी यांच्याकडून जिल्हय़ातील गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवती तसेच मूल, सावली, भद्रावती वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागड्टाीड व सिंदेवाही आणि बल्लारपूर या तालुक्यांमध्ये सुध्दा माल पोहोचविला जात होता. अन्न व औषध प्रशासन विड्टाागाने या तिघांवर कारवाई केली असली तरी गुटखा व तंबाखू तस्करीचे हे रॅकेट मोठे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. छत्तीसगड व आंध्रप्रदेशात या तिघांचे पगारी कर्मचारी सक्रिय असून त्यांच्या माध्यमातूनच या जिल्हय़ात हा माल आणला जात असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच बहुतांश तालुक्यांच्या ठिकाणी सुध्दा या तिघांचे गोदाम आहेत. रॅल्वे किंवा खासगी मालवाहक ट्रकच्या माध्यमातून हा तंबाखू या जिल्हय़ात आणला जायचा आणि इथून तो ग्रामीण भागात वितरीत केला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान या कारवाइने तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चंद्रपूर कार्यालयाने गोंदिया, भंडारा व गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून पूर्व विदर्भात चालणाऱ्या गुटखा व तंबाखूच्या तस्करीच्या विरोधात संयुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
anti narcotics squad arrest rajasthan youth in kharadi area for selling opium
अफू विक्री करणारा गजाआड; राजस्थानातील तरुणाकडून दोन लाखांची अफू जप्त
Story img Loader