मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, असंदेखील त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याचे तसेच त्याबाबत नागरिकांना सतर्क करण्याचे आदेश राज्य सरकारने प्रशासनाला दिले आहेत. याबरोबरच राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी, बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी, अशा सुचना प्रशासनाला देण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Coconut expensive due to Wayanad landslides Mumbai news
वायनाडच्या भूस्खलनामुळे सणासुदीला ‘श्रीफळ’ महाग
Marathwada, dams, water storage,
मराठवाडा वगळता राज्यातील धरणे काठोकाठ, सविस्तर वाचा राज्यातील विभागनिहाय पाणीसाठा
Nirbhaya Squad, Maharashtra, women’s safety, Nirbhaya Squads in Maharashtra Remain Largely Inactive, police commissionerates, Nagpur,
राज्यातील निर्भया पथक कागदावरच!
rain Pune, Pune rain news, Pune weather,
पुण्यात सरींवर सरी
rain Maharashtra, rain news, Maharashtra weather,
राज्यात पावसाचा जोर कमी होणार ? जाणून घ्या, गुजरातमध्ये मुसळधार आणि राज्यात उघडीप का ?
forecast of the Meteorological Department there is a possibility of heavy rain in some parts of Maharashtra Nagpur
राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खाते…

हेही वाचा – “ठाकरे सरकारमुळेच मराठा आरक्षण रद्द झालं”; देवेंद्र फडणवीसांची टीका; म्हणजे, “आज जे राजकारण सुरू आहे…”

राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे, पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, असं प्रशासनाला सांगण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शहरांमध्ये पाणीदेखील साचले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. महत्त्वाचे म्हणजे, हवामान विभागाने आजसुद्धा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.