छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (१६ सप्टेंबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते. तब्बल सात वर्षानी कॅबिनेटची बैठक मराठवाड्यात आयोजित करण्यात आली होती. मराठवाड्यासाठी ५९ हजार हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचाही यात समावेश आहे. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती, असं या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. राज्यातच नाही तर देशात एक मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकांनी मराठवाड्यासाठी घोषणा केल्या, आम्ही मात्र काम करतो आहोत. आत्तापर्यंत आमच्या मंत्रिमंडळाने सामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले आहेत.

khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
thane tripartite metro project loksatta news
ठाणे अंतर्गत मेट्रोच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारास मान्यता; केंद्र, राज्य शासन आणि महामेट्रो यांच्यात होणार करार
Versova-Bhyander Coastal Road Project, contracts ,
वर्सोवा-भाईंदर किनारपट्टी मार्ग प्रकल्पाचे गौडबंगाल, महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
mmrda planned various road projects to solve traffic congestion problem in thane kalyan and navi mumbai
ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील रस्ते प्रकल्पांना गती; वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत पार पडली महत्वाची बैठक
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार

हे ही वाचा >> “डेंग्यूसारखाच सनातन धर्मही….”, उदयनिधींच्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच भाष्य

मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय

⦁ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर.
⦁ अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार
⦁ छत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना
⦁ ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १,०७६ कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ.
⦁ हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय उभारणार. ४८५ कोटी खर्चास मान्यता
⦁ राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना ८५ हजार रुपये दरमहा मानधन, १२.८५ कोटी खर्च
⦁ सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार
⦁ समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ.
⦁ राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय.
⦁ सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय
⦁ परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
⦁ परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय
⦁ परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण आणि प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार
⦁ सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय
⦁ नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
⦁ धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा
जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. १० कोटींची मान्यता
⦁ गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबई येथे भूखंड देणार
⦁ राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान राबविणार
⦁ २००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि २००९ मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ

Story img Loader