दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत ७२ तारांकित प्रश्न सादर करण्यात येणार होते. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी गोंधळातच प्रश्नोत्तराची सुरुवात केल्यानंतर उर्वरित प्रश्ने लिखित स्वरूपातच सादर करण्यात आली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीला शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याचा तारांकित प्रश्न प्रा. कवाडे यांनी उपस्थित केला. त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हे खरे नसल्याचे सांगितले. दिल्लीच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन्याबाबतची मागणी खरी नाही, असे ते म्हणाले. राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील ५४ माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबतचा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला होता. त्यासंदर्भात २०१४च्या अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर झाली असून, बिगर आदिवासी क्षेत्रातील ५४ माध्यमिक शाळांना जून, २०१४ पासून वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. राज्यातील २०८५ गावांमध्ये प्राथमिक शाळा व १३२ गावात माध्यमिक शाळा नसल्याबाबतच्या रामहरी रुपनवर, संजय दत्त व भाई जगताप यांच्या प्रश्नावर हे खरे नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे इतरत्र समायोजन होईपर्यंत मूळ आस्थापनेवरून वेतन नियमित वितरित करण्याबाबतच्या शरद रणपिसे, संजय दत्त, भाई जगताप यांच्या प्रश्नावर हे खरे नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोमेश्वर नैताम यांनी केलेल्या गैरव्यवहारावर चौकशी सुरू असल्याचे उत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा