लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्यसरकारच्या मंजूरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.

Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत
Investment opportunity in Adani company shares will be available at a discount
अदानींच्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी, सवलतीत मिळणार शेअर
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी
second phase of Taliye rehabilitation will be completed in June
तळीये पुनर्वसनाचा दुसरा टप्पा जूनमध्ये पूर्ण
MMRDA Thane Bhayander road project
ठाणे भाईंदर प्रकल्प लवकरच मार्गी, ‘एमएमआरडीए’च्या एकत्रित निविदेला पाच कंपन्यांचा प्रतिसाद
Nashik municipal corporation accept building plan submissions online in new year
बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी ८० एकर जागेचे संपादन पूर्ण झाले आहे. ५० कोटींचा प्राथमिक निधी राज्यसरकारने दिला होता. त्यानुसार शिवसृष्टी उभारणीच्या कामांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शिवसृष्टी उभारण्यात येणार असून, किल्ल्याचा तसेच शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहास या निमित्ताने किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना आणि शिवप्रेमींना अनुभवता येणार आहे. राज्यात विवीध ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टींचा अभ्यास करून या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला. ज्याचे सादरीकरण नुकत्याच पार पडलेल्या रायगड प्राधिकरणाच्या बैठकीत करण्यात आले. यानंतर शिवसृष्टीचा आराखडा अंतिम मंजूरीसाठी राज्यसरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर शिवसृष्टीच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.

आणखी वाचा-‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन

कोकण भवन येथील आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीला कोकण विभागाचे महसूल आयुक्त डॉ. राजेश देशमूख, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे, उपआयुक्त(नियोजन) प्रमोद केंबावी, रायगडचे उप जिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, महाडचे उपविभागीय ज्ञानोबा बानापूरे, रायगड पाणी संवर्धन विभागाचे अधिक्षक अभियंता संजय शिंदे, रोहाचे सहाय्यक वनसंरक्षक रोहित चोबे, पेण-रायगड विद्यूत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती संजिवनी कट्टी तसेच प्राधिकारणाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रायगड विकास आराखड्यात समाविष्ट कामांचा तपशील…

किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन दाखविण्यासाठी शिवसृष्टी तयार करणे. रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पध्दतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पध्दतीची स्वच्छतागृहे बांधणे,घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे.

आणखी वाचा-Rahul Narwekar : “मी सत्ताधारी आणि विरोधकांना…”, विधानसभेतील कामकाजावर राहुल नार्वेकरांचे परखड मत

रायगडावर करण्यात येणारी कामे…

यात रायगड किल्यावरील चीत्त दरवाजा, नाना दरवाजा, खुबल्डा बुरुज , महादरावाजा आदींचे संवर्धन व जिर्णोध्दार करणे. तसेच, पर्यटक व शिवप्रेमींना रायगडावर पोहचण्यासाठी मजबूत पायवाटा निर्माण करणे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी महत्वाच्या सोयी उपलब्ध करून देणे, जलसंवर्धन करणे या बाबींचा समावेश आहे. याशिवाय पाचड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जिर्णोध्दाराचे कार्य तथा याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवसृष्टी उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठीचा आराखडा राज्यसरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. -डॉ. रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रायगड

Story img Loader