मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. राज्याबाहेरील नेत्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही कायम ठेवली. 

राज्यातील राज्यसभा निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पक्षाने विद्यमान खासदार पी. चिदम्बरम यांना तमिळनाडूत उमेदवारी दिली. महाराष्ट्रातून कवाली गायक व प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे. प्रतापगढी यांची उमेदवारी रविवारी सकाळीच निश्चित करण्यात आली तेव्हा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दुसरा उमेदवार देण्याची मागणी दिल्लीत केली होती. विशेषत: अल्पसंख्याक विभागाच्या नेत्यांनी राज्याबाहेरील अल्पसंख्याक उमेदवार उभा करण्यास विरोध दर्शविला होता. परंतु पक्ष नेतृत्वाने नेहमीप्रमाणेच राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत बाहेरचा उमेदवार लादला.  मुकूल वासनिक यांना राज्यातून उमेदवारी देण्याचे प्रस्तावित होते. परंतु राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी इम्रान प्रतापगढी यांच्या नावाला विरोध दर्शविल्याने वासनिक यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याऐवजी प्रतापगढी यांना राज्यातून उमेदवारी देण्यात आल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.

suvendu adhikari Mamata Banerjee
‘आता बंगालची पाळी’, दिल्ली विजयानंतर भाजपा नेत्याचे ममता बॅनर्जींना आव्हान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
devendra fadnavis interview in loksatta Varshvedh event
महाराष्ट्रात युतीचे राजकारण आणखी काही काळ चालेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
Delhi Assembly Election Results 2025
Delhi Election Video: आठवा वेतन आयोग, प्राप्तिकर घोषणा ते न झालेली युती; गिरीश कुबेर यांच्या शब्दांत ‘आप’च्या पराभवाची कारणमीमांसा!
Chandrashekhar Bawankule
महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
Radhakrishna vikhe patil
अण्‍णा हजारे यांच्या विचारांशी फारकत घेणाऱ्या केजरीवालांना जनतेने प्रायश्चित्त करायला लावले – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Supriya Sule latest news in marathi
मतपत्रिकेद्वारेच निवडणूक घ्या; सुप्रिया सुळे यांची मागणी
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका

जी -२३ या बंडखोर गटातील गुलामनबी आझाद आणि आनंद शर्मा यांची उमेदवारी पक्षाने पहिल्या यादीत तरी जाहीर केलेली नाही. एका बडय़ा उद्योगपतीच्या माध्यमातून राज्यातून पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राजीव शुक्ला यांना छत्तीसगडमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

बाहेरच्या उमेदवाराची परंपरा कायम 

काँग्रेसने आतापर्यंत विश्वजीत सिंग व राजीव शुक्ला,(प्रत्येकी दोनदा)  पी. चिदम्बरम  व गुलामनबी आझाद या बाहेरच्या राज्यातील नेत्यांना राज्यातून राज्यसभेवर पाठविले आहे. भाजपनेही केरळातील पी. मुरलीधरन यांना २०१८ मध्ये राज्यातून राज्यसभेवर पाठविले आहे.

सोनिया व राहुल यांच्या निष्ठावानांना संधी

*भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १० उमेदवारांची नावे जाहीर केली. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे विश्वासू जयराम रमेश यांना कर्नाटकमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे निष्ठावान अजय माकन व रणदीप सुरजेवाला यांना अनुक्रमे हरियाणा व राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. * माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना तामीळनाडूमधून उमेदवारी दिली असून द्रमूकने आपल्या कोटय़ातील एक जागा काँग्रेसला देण्याचे मान्य केले होते. चिदम्बरम यांची सहा वर्षांची मुदत संपत असून ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, जुनेजाणते प्रमोद तिवारी या दोघांनाही राजस्थानातून राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधून विवेक तन्खा हे पुन्हा राज्यसभेत जाऊ शकतील. छत्तीसगढमधून राजीव शुक्ला व रंजीत रंजन यांना उमेदवारी दिली गेली आहे. रंजीत रजन या गेल्या लोकसभेत काँग्रेसच्या सदस्य होत्या.

Story img Loader