ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनाही इम्तियाज जलील यांनी सूचक इशारा दिला. “तू मला ओळखत नाही रे राजा. तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले,” असं वक्तव्य जलील यांनी केलं. ते मंगळवारी (१२ जुलै) औरंगाबादमध्ये नामांतर विरोधात भडकल गेट परिसरात काढलेल्या भव्य मूक मोर्चात बोलत होते. या मोर्चाचे रूपांतर हमखास मैदानातील सभेत झाले होते.

इम्तियाज जलील म्हणाले, “सोशल मीडियावर काही तरुण माझ्यावर चुकीच्या कमेंट करत आहेत. ते मला जशास तसं उत्तर देऊ असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘अरे तू मला ओळखत नाही रे राजा’. तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले. चुकीच्या लोकांमध्ये अडकू नका. हे शहर आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचं आहे.”

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”

“जे लोक या सभेला आलेले नाहीत, त्यांची वाट लागणार आहे”

“आजच्या या सभेला जे आलेले नाहीत त्यांना देखील लक्षात ठेवलं जाईल. तुमच्यासाठी तुमचं राजकारण महत्त्वाचं असेल, मात्र आम्ही अशा राजकारणाला लाथ मारतो. जेव्हा आपल्या शहराच्या अस्तित्वाचा, ओळखीचा प्रश्न येतो तेव्हा आपण एक ताकद बनून उभे राहू. त्यामुळे जे लोक या सभेला आलेले नाहीत, त्यांची वाट लागणार आहे,” असा सूचक इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.

“काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर…”

इम्तियाज जलील पुढे म्हणाले, “आत्ता मी केवळ एका पक्षाचं नाव घेत नाहीये, पण काँग्रेसवाले नेहमी असं म्हणायचे की आमच्या किमान समान कार्यक्रमात औरंगाबादच्या नामांतराचा विषय नाही. त्यामुळे असा निर्णय होणार नाही. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही विरोध केला नाही. काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर २०१४ मध्ये मला सत्ता नको, या शहराचं नाव बदलायचं आहे असं का सांगितलं नाही.”

हेही वाचा : “पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढावा, राजकीय भूकंप होईल”; जलील यांच्या वक्तव्यावर दानवेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“अशोक चव्हाणांचा समाचार घ्यायला मी नांदेडला देखील जाणार”

“नांदेडचे एक साहेब आहेत, अशोक चव्हाण. त्यांनी नीट ऐकावं, तुमचा समाचार घ्यायला मी नांदेडला देखील येणार आहे. त्यांनी केवळ या नामांतराला पाठिंबा दिला नाही, तर त्यांनी आपल्याला इतिहासच शिकवला. इतिहासात काय झालं हे कुणीही नष्ट करू शकत नाही. इतिहासात चांगलं झालं, वाईट झालं ते इतिहासाचा भाग आहे,” असंही जलील यांनी नमूद केलं.