कर्जत: तालुक्यातील रवळगाव शिवारामध्ये सापडलेला मृतदेह दत्तात्रेय राठोड राहणार जमशेदपूर तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ येथील असून त्याचा खून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील संतोष शिवाजी काळे यानी केला असल्याचे पोलीस तपासामध्ये उघड झाले आहे. पत्नी ललिता राठोडने प्रियकराच्या (संतोष ) मदतीने अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्जत तालुक्यातील रवळगाव शिवारामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह चेहरा दगडाने खेचून अर्धवट अवस्थेत पुरलेला आढळून आला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, अहिल्यानगर व मिरजगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व पोलीस यंत्रणेचा वापर करून या घटनेतील मुख्य आरोपी हा इंदापूर तालुक्यातील पळसदेवी येथील संतोष शिवाजी काळे हा असून त्याला पोलीसांनी अटक केली आहे.

हेही वाचा : अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना

मागील दोन वर्षांपासुन दत्तात्रय वामन राठोड व त्यांची पत्नी ललिता आणि तिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव असे ऊस तोडणीच्या कामास होते. त्यातून ओळख होऊन संतोष शिवाजी काळे व ललिता दत्तात्रय राठोड यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. याची माहिती ललिता हिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव यास झाली होती. तसेच ललिता राठोड हिचा पती दत्तात्रय राठोड हा दारू पिऊन तिच्यावर संशय घेत तिला सतत मारहाण करत होता. ८ जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास प्रियकर संतोष काळे हा ललिता राठोड हिला भेटण्यासाठी जमशेदपूर (तालुका डिग्रस) येथे गेला. त्यावेळी महिलेचे पती दत्तात्रय राठोड तेथे आले व त्यांच्यात वाद होऊन त्यांनी पत्नी ललिताला मारहाण केली. त्यावेळी संतोष काळे, ललिता राठोड व तिचा भाऊ प्रविण जाधव अशांनी मिळून दत्तात्रय वामन राठोड यांना मारहाण करून त्यांचा गळा दोरीने आवळून त्यांना जीवे ठार मारले. दत्तात्रय राठोड यांचा मृतदेह रात्री ते राहत असलेल्या कोपीमध्ये ठेवला. त्यानंतर ९ जानेवारी रोजी संतोष काळे याने त्याच्याकडील चार चाकी वाहनाने राठोड यांचा मृतदेह प्रविण जाधव याच्यासह मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आणून पुरावा नष्ट करण्यासाठी जमिनीत अर्धवट पूरला व चेहरा ओळखू येऊ नये म्हणून दगडाने ठेचला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ahilyanagar karjat woman killed husband with the help of lover buried dead body after murder css