अहिल्यानगर : शहरात काल, सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात आवाजाच्या भिंतीचा (डीजे) दणदणाट करत ध्वनिप्रदूषण केल्याच्या आरोपावरून आठ मंडळाचे अध्यक्ष व स्पिकर मालकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तोफखाना पोलिसांनी पाच तर कोतवाली पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले.
निलक्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित उत्तम घाटविसावे (रा. निलक्रांती चौक) व डीजे मालक भारत तानाजी मांढेकर (रा. चांदे, मुळशी, पुणे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मित्र मंडळाचे अध्यक्ष सौरभ रवींद्र भिंगारदिवे (रा. सावेडीगाव), डीजे मालक प्रमोद राजू काळे (रा. बेळगाव, कर्नाटक), कॅम्प कौलारू मित्र मंडळाचे अध्यक्ष विनित पाडळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. कॅम्प कौलारू) व डीजे मालक अक्षय बापू लावंड (रा. चंदननगर, पुणे), मिलिंद तरूण मंडळाचे अध्यक्ष आदेश शरद साळवे (रा. मंगलगेट) व डीजे मालक छोटू ज्ञानदेव क्षीरसागर (रा. मंगलगेट), सिध्दार्थनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिषेक कांबळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सिध्दार्थनगर) व डीजे मालक देविदास खंडू कर्डिले (रा. कडा, आष्टी, बीड) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंडळ अध्यक्ष पंकज रमेश दिवे (रा. डॉन बास्को कॉलनी, सावेडी) व डीजे मालक प्रशांत शिवाप्पा सनदी (रा. बेळगाव, कर्नाटक), मंडळ अध्यक्ष आकाश लक्ष्मण शिंदे (रा. शांतीनगर, सारसनगर) व डीजे मालक प्रसाद बाबासाहेब आंबेकर (रा. आंबेकर मळा, अहिल्यानगर), मंडळ अध्यक्ष शुभम साहेबराव बडेकर (रा. सुडके मळा, अहिल्यानगर) व डीजे मालक विकास पंढरीनाथ माने (रा. बाबुर्डी घुमट, ता. अहिल्यानगर) यांच्याविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिरवणुकीदरम्यान मंडळ अध्यक्ष व डीजे मालक यांनी कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण केले. त्यांना बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही त्यांनी कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवून आवेशपूर्ण घोषणाबाजी केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अर्टी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.