अलिबाग : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्या धमकी दिल्या प्रकरणात, संबधित अधिकाऱ्यानेच आता माघार घेतली आहे. हा प्रकार गैरसमजूतीतून झाला असून आपली आमदारांबाबत कुठलीच तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. समाज माध्यमांवर या संदर्भातील ध्वनीचित्रफीत जारी केली आहे.

आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता महेंद्र राठोड यांना धमकी दिल्याची ध्वनीफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. महावितरणच्या सब ऑर्डीनेट इंजिनिअर असोसिएशनने याचा निषेध करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिले होते. आमदार दळवी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. पण आता या प्रकरणात धमकावण्यात आलेले महावितरणचे सहाय्यक महेंद्र राठोड यांनी माफीनामा जारी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

हेही वाचा : काँग्रेसकडून महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित

हा प्रकार गैरसमजुतीतून झाला. माझी आमदार दळवी यांच्याबद्दल कुठलीही तक्रार राहीलेली नाही. आमदारांनी एका ग्राहकाच्या तक्रारीवरून मला फोन केला होता. या फोनवरून गैरसमज निर्माण झाला. नंतर ही ध्वनीफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. आता हा गैरसमज दूर झाला असून, मी झालेल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमदार दळवी यांचेही माझ्याबद्दल असलेले गैरसमज दूर झाले असल्याचे राठोड यांनी जारी केलेल्या माफीनाम्यात नमूद केले आहे. राठोड यांच्या माफीनाम्यामुळे या धमकी प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

Story img Loader