अलिबाग : खोपोली शिळफाटा येथे टँकर उलटून अपघात झाला. अपघातानंतर टँकरला अचानक आग लागली. टँकरला लागलेल्या आगीमुळे रस्त्यालगत असलेल्या गवताने पेट घेतला आणि आग पसरायला सुरुवात झाली. यामुळे रस्त्यालगत डोंगरावर असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांचं वक्तव्य; “मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण…”

टँकर मधील रसायनाने पेट घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. खबरदारी म्हणून या परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली असून वीज पुरवठा ही खंडित करण्यात आला आहे.

खोपोली नगर पालिका, जे एस डब्लू , टाटा कंपनी व इतर फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.