Ganesh Panchayatan Kolaba Alibag: माघी गणेशोत्सवानिमित्ताने अलिबागच्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यातील गणेश मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली आहे. राज्यातील एकमेव गणेश पंचायतन म्हणून या गणेश मंदीराची ओळख आहे. अशीं मंदीर देशात फारशी आढळत नाही. या गणेश पंचायतनाची स्थापना कशी झाली जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सागरी सिमांचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण करता यावे यासाठी १६८० मध्ये कुलाबा किल्ल्याची उभारणी करण्यात आली. अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा सागरी किल्ला असून ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आजही भक्कम स्थितीत उभा आहे. मराठा आरमाराच्या जाज्वल्य इतिहासामुळे किल्ल्याचे महत्व आहेच, पण त्याच बरोबर येथील गणेश पंचायतन मंदीर हे देखील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात बदलले पेट्रोल-डिझेलचे दर; पाहा मुंबई-पुण्यात काय सुरु आहे भाव

मंदिराचे बांधकाम

संपुर्ण काळ्या दगडात बांधण्यात आलेल्या या मंदिराची उभारणी थोरल्या राघोजी राजे आंग्रे यांनी केली होती. १७५९ मध्ये या मंदीराचे बांधकाम करण्यात आले. मंदिराच्या प्रवेश द्वारावर डाव्या बाजूला कार्तिकस्वामी तर उजव्या बाजूला गणेशाची प्रतिमा कोरली आहे. मंदीराचे सभागृह अष्टकोनी आहे. मंदीराच्या उजव्याबाजूला महादेवाचे आणि उजव्याबाजूला हनुमानाचेही मंदीर आहे.

गणेश पंचायतन

कुलाबा किल्ल्यात पोखरणीच्या पश्चिमेस गणेशाचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात चौथऱ्यावर मध्यभागी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची सुंदर मूर्ती आहे. पुढील बाजूस डावीकडे शंकर, उजवीकडे विष्णू, मागील बाजूस उजवीकडे सुर्य आणि डावीकडे देवीची मुर्ती आहे. पाच मुर्तींचा समूह या मंदीरात असल्याने या मंदिराला गणेश पंचायतन असे संबोधले जाते. अशा प्रकारे गणेश पंचायतन असलेले हे राज्यातील एकमेव गणेश मंदीर आहे. नेपाळ मध्ये अशी गणेश पंचायतन मंदिर आढळतात.

हेही वाचा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती

भाविकांचे श्रध्दास्थान….

नवसाला पावणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे देवस्थान म्हणून या गणेश पंचायतनाची ओळख आहे. त्यामुळे राज्यभरातून कुलाबा किल्ल्यातील या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. माघी गणेशोत्सवाच्या दिवशी पहाटे पाच वाजता महापूजा झाल्यावर गणेश पंचायतनचे दर्शन घेऊन नवस फेडण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत असते. गणेश मंदीरासह किल्ल्यावर आकर्षक रोषणाई केली जाते. फुलांची तोरणे लावली जातात. भव्य रांगोळ्या काढल्या जातात. यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद केला जातो. अलिबाग तालुक्यातून लाखो गणेशभक्त या निमित्ताने दाखल होत असतात.