अलिबाग : समुद्र किनाऱ्यावरील अवैध रेती उत्खननास विरोध केला म्हणून विरोध करणाऱ्याच्या डोक्यात फावडा घातल्याची घटना रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील नांदगाव येथे घडली. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर रेती उत्खननाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुरूड तालुक्यातील नांदगाव येथे समुद्र किनाऱ्यावर वाळू माफीयांची वक्रदृष्टी पडली आहे. समुद्र किनाऱ्यावरील रेती बांधकामासाठी राजरोसपणे काढली जात आहे. कृष्णा बाबाजी दिवेकर हे आपले बागकाम करत असतांना समुद्र किनाऱ्यावर एक जण रेती उत्खनन करत असल्याचे त्यांना आढळून आले. रेती उत्खनन करणाऱ्या या व्यक्तीस त्यांनी हटकले. याचा राग आला म्हणून सदर व्यक्तीने हातातील फावड्याने दिवेकर यांच्या डोक्यात वार केला. यात ते जखमी झाले.

हेही वाचा : भाजपच्या खासदारद्वयीचा विलासरावांच्या पुतळ्यासाठी पुढाकार, मुंडेंचे स्मृती भवन दुर्लक्षित !

याबाबतची रीतसर तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून अवैध रेती काढणारा व जखमी करणारा प्रकाश नारायण राऊत याच्यावर भादंवि कलम ३२४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी दोन टेम्पो व दोन बैलगाडी मधील वाळू पकडून मुरुड पोलिसांच्या हवाली केली आहे. या रेती माफीयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alibag man hits with shovel on the head for opposing illegal sand mining css