अलिबाग : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे फिरते वस्तुसंग्रहालय अलिबागमध्ये दाखल झाले आहे. बसवर असलेले हे फिरते वस्तुसंग्रहालय पुढील पाच दिवस ते अलिबाग तालुक्यातील विविध शाळांना भेट देणार आहे. विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालयाची महिती व्हावी म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील विद्यार्थ्यांनी या फिरत्या वस्तुसंग्रहालयाचा अनुभव घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामार्फत गेली आठ वर्ष फिरते वस्तुसंग्रहालय हा उपक्रम राबविला जात आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालयाची ओळख व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी वस्तुसंग्रहालय प्रशासनाने दोन अत्याधुनिक बसेसची निर्मिती केली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरील वस्तुसंग्रहांचे प्रदर्शन या माध्यमातून केले जात आहे. या बसेस राज्यभरात जाऊन वस्तुसंग्रहालयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करत आहेत. यातील एक बस सध्या अलिबागच्या दौऱ्यावर आली आहे. पुढील पाच दिवस ही बस विविध शाळांना भेट देणार आहे.

हेही वाचा : नागपूर : काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर मंथन, राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेबाबतही चर्चा

ही बस अलिबाग चोंढी येथे दाखल झाली होती. शाळेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ अशा दीड हजारहून अधिक जणांनी या अनोख्या फिरत्या वस्तू संग्रहालयाला भेट दिली. प्राचीन संस्कूती आणि शिल्पकला यावर हे प्रदर्शन आधारीत आहे. भारतासह, ग्रीस, इजिप्त, असेरीया, रोम या देशातील शिल्प प्रतिकृती या वस्तूसंग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी विविध वाद्यांची ओळख करून देणारे प्रदर्शन बसच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. यावर्षी शिल्प आणि शिल्पकलेवर आधारीत संग्रहालय राज्यभरात पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोल- डिझेलचे नवीन दर जारी, मुंबई-पुण्यात आजचा भाव काय

अलिबाग तालुक्यातील शाळा आणि पर्यटन केंद्रांना हे वस्तुसंग्रहालय भेट देणार आहे. प्राचिन काळातील शिल्पकला कशी विकसित झाली. त्यात कशी वाढ होत गेली याची माहिती या उपक्रमातून मिळणार आहे. हे वस्तुसंग्रहालय सर्वांसाठी खुले असणार आहे अशी माहिती या उपक्रमाच्या समन्वयक शांतिनी सुतार यांनी दिली. शुक्रवारी सारळ हायस्कूल येथे तर शनिवारी मांडवा जेटी येथे हे प्रदर्शन नागरिकांना आणि पर्यटकांना पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alibag mumbai s chhatrapati shivaji maharaj mobile museum for school students css