अलिबाग: रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणारे बसलेले असतात. ते तुमचा भाग्योदय होणार, भरभराट होणार असे भविष्य सांगतात, तेव्हा आपल्याला तात्पुरते का होईना बरे वाटते. पण नंतर या भविष्यकारांनी सांगितलेले भविष्य कधी खरं ठरत नाही. त्याच प्रमाणे महाविकास आघाडीचे नेते सध्या राज्यभर आमच्या इतक्या जागा येणार असे सांगत पोपटपंछी करत फिरत आहेत. त्यांच्या खोट्या भविष्यवाण्यामध्ये फसू नका असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी अलिबाग येथे महिला सन्मान यात्रे दरम्यान केले.
राज्य सरकारने महिलांना आर्थिक दृष्टा सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. ज्याचा लाभा ग्रामिण तसेच शहरी भागातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मिळणार आहे. ही योजना म्हणजे महिलांना सन्मान देणारी योजना आहे. ही योजना निवडणूकी पुरता महिलांचा केलेला सन्मान नाही तर तो निवडणूकीनंतरही कायम राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी नोंदणी करा. नोंदणी केल्याचा पूरावा जपून ठेवा असे सूचना त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केली.
हेही वाचा : Solapur Rain News: उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय, धरण उपयुक्त पातळीत जाण्याची अपेक्षा
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून योजनेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र विरोधकांच्या या कांगाव्यात फसू नका. भाऊ म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठल्याही बहिणीची फसवणूक होऊ देणार नाही. सरकार जनताभिमुख आहे. त्यासाठी विवीध योजना सरकारने राबवल्या आहेत. त्यांचा लाभ घ्यायला हवा असे अशी अपेक्षा गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा : Ashish Shelar :देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना आशिष शेलारांचे चार प्रश्न, म्हणाले…
शाश्वत विकास उदीष्टसाठी आंतर्गत नाविन्यपुर्ण प्रकल्प राबविता येऊ शकतात. ज्यासाठी जिल्हा नियोजन निधीमधून २५ ते ५० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविता येऊ शकतो. या अंतर्गत महिला बचत गटानीं कृषी प्रक्रीया अथवा मत्स प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य मी करीन अशी ग्वाही निलम गोऱ्हे उपस्थित महिलांना संबोधित करताना दिली. या कार्यक्रमाला शिवसेना आमदार महेंद्र दळवी, आमदार भावना गवळी, शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे, कला शिंदे, शिल्पा देशमुख आणि संजिवनी नाईक उपस्थित होत्या.