अलिबाग : विनायक मेटे यांच्या पश्चात बंद पडलेल्या शिवसंग्राम संघटनेची पुर्नबांधणी करण्यात आली आहे. मेटे यांचे बंधू राम हरी मेटे यांनी आज किल्‍ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या साक्षीने ‘जय शिवसंग्राम’ या नवीन संघटनेची घोषणा केली. विनायक मेटे यांचे अकाली निधन झाल्यानंतर शिव संग्राम संघटनेचे काम थांबले होते. परंतु त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी या नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनायक मेटे यांच्‍या स्‍वप्‍नातील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्‍मारक पूर्ण होण्‍यासाठी पाठपुरावा करणार असून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय सहभाग घेवून ते मिळवल्‍याशिवाय स्‍वस्‍थ बसणार नाही, असे राम हरी मेटे यांनी स्‍पष्‍ट केले. या खेरीज शेतकऱ्यांचे प्रश्न , राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे प्रश्न घेवून आम्ही लढा देऊ, वेळ आली तर रस्त्यावर उतरू, असे मेटे यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्याला स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची अद्यापही प्रतीक्षा; मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक येथे प्रस्ताव

रामहरी मेटे हे संघटनेचे प्रमुख राहणार असून सुरेश शेटये पाटील यांची संघटनेच्‍या महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्षपदी निवड जाहीर करण्‍यात आली. आज किल्‍ले रायगडावरील छत्रपतींच्‍या पुतळयाला आणि श्री जगदीश्‍वर मंदिरात अभिवादन करण्‍यात आले. भगवे फेटे परिधान केलेले कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा जयघोष करीत होते. महाराष्‍ट्र आणि कर्नाटक मधील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Maharashtra News Live : “….म्हणून पंतप्रधान मोदींना सतत महाराष्ट्रात यावं लागतंय”, संजय राऊतांची टीका

“स्व. विनायक मेटे ज्या उद्देशाने काम करीत होते त्याची उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची धडपड सुरू होती. तोच वसा घेवून आम्ही पुढे जाणार आहोत. या चांगल्या कामाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद लाभावेत, या हेतूने आम्ही रायगड किल्ल्यावरून या कामाची सुरुवात केली”, असे जय शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष सुरेश शेट्येपाटील यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alibag vinayak mete s brother ram hari mete starts new organization named jay shivsangram css