सोलापूर: बार्शी तालुक्यात दोघा वृद्धांनी एका मागासवर्गीय ११ वर्षांच्या मुलीला चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपींपैकी एकजण किराणा मालाचा व्यापारी आहे.याबाबत पीडितेच्या पालकांनी वैराग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, निळू बळीराम माने (वय ६०) आणि आगतराव मुळे (वय ८०) या दोघा वृद्धांविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित मुलीचे आई-वडील रोजंदारी मजूर आहेत. मजुरीसाठी दोघे घराबाहेर पडतात. पीडित मुलगी घराजवळील एका किराणा माल दुकानात खाऊ विकत घेण्यासाठी गेली असता या वृद्धांनी तिचा विनयभंग केला. ही बाब पीडित मुलीने घरी आईच्या कानावर घातली असता, तिने संबंधित वृद्धांना बजावले होते. दरम्यान, काही दिवसांनी संध्याकाळी आई घरी परतली असता, तिच्यासमोर पीडित मुलगी रडत आली. आईने कारण विचारले असता पीडित मुलीने संबंधितांनी पुन्हा चुकीचे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In barshi taluka two old men molested an 11 year old backward class girl by luring her with chocolates and money amy