भीमाशंकर येथील नागफणी पॉईंट वरून सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत दोन अनोळखी व्यक्ती पडल्याचे निदर्शनास आले आहे. तरुणीचा मृतदेह हा पोलिसांना ४०० फुटांवर दिसला असून मृतदेह वर काढण्याचे काम सुरु आहे तर तरुण अद्याप सापडलेला नाही.
ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक नागरिक तरुणाचा शोध घेत आहेत. हे दोघे कोण आहेत किंवा कोठून आले याचा शोध खेड पोलिसांकडून सुरु आहे.