छत्रपती संभाजीनगर : चोरट्यांच्या मारहाणीत घराबाहेर अंगणात झोपलेले एक वृध्द जागीच ठार झाले तर एक महिला जखमी झाली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री शेंदुरवादा येथे घडली आहे. नारायण निकम (७०) असे मृत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाळूज पोलिस ठाणे हद्दीतील या घटनेत चोरट्यांनी नारायण निकम यांच्या डोक्यावर जबर मारहाण सुरू केली. त्यांच्या ओरडण्याने सूनबाई अन्नपूर्णा निकम या बाहेर आल्या तर त्यांच्यावरही हल्ला करत कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले.

हेही वाचा…सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी पादचाऱ्याचा खून

त्यांच्यावर घाटी दवाखान्यात उपचार सुरू आहे. तर नारायण निकम यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वाळूजचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, उपनिरीक्षक अजय शितोळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप गुरमे यांनीही भेट देऊन पाहणी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chhatrapati sambhajinagar elderly man killed woman injured in attack by thieves psg