चिपळूण : कुंभार्ली घाटातून चिपळूणमध्ये दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना घाटातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागला. पवारांचा चिपळूण दौरा आठवडाभरापूर्वी जाहीर झाला होता तरीही घाटातील खड्डे भरण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही. चिपळूणच्या भर सभेत शरद पवारांनी या रस्त्याच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. इतके खराब रस्ते महाराष्ट्रात कुठेच नाहीत असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिपळूणचे मैदान गाजवण्यासाठी ८३ वर्षाचा योद्धा येत असताना त्याला त्रास देण्याची वेगळी शक्कल सत्ताधाऱ्यांनी या खड्ड्यांच्या माध्यमातून लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवारांच्या स्वागताची तयारी चिपळूण तालुक्यात चिपळूण पोफळी मार्गावर ठिकठिकाणी करण्यात आली होती. कुंभार्ली घाटातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शरद पवार यांना तब्बल दीड तास चिपळूण मध्ये पोहोचण्यास उशीर झाला.

हेही वाचा : Sharad Pawar : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “आम्ही…”

कुंभार्ली घाटात जागोजागी अनावश्यक भिंती आणि अनावश्यक ठिकाणी मोऱ्या बांधून कुंभार्ली घाट आणि चिपळूण कराड मार्गावर कोट्यावधी रुपयाची उधळण सार्वजनिक बांधकाम विभागाने करून ठेकेदारांचे खिस्से भरले. सत्ताधाऱ्यांनी त्याला विकास असे गोंडस नाव दिले. मात्र घाटातील रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचा सामान्य नागरिकांपासून ते राजकीय लोकप्रतिनिधींना सुद्धा त्रास होत आहे. त्याला काय म्हणायचे असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. संरक्षण भिंतीसाठी कोट्यावधी रुपये बजेट मधून मंजूर करून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी निधी नाही का ? असा प्रश्न नागरिक आणि वाहन चालक विचारात आहेत. कुंभार्ली घाटातील रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात हे खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यावधी रुपयाची निविदा काढली जाते. शासनाचा निधी खर्च पडून विकासकामे केल्याचा गवगवा राजकीय नेते करतात. प्रत्यक्षात हा विकास सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही तो केवळ ठेकेदारांना सक्षम करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना त्यांची टक्केवारी मिळण्यापर्यंत मर्यादित राहतो असा अनुभव आता कुंभारली घाटातील रस्त्याची दुरावस्था पाहून येत आहे.

हेही वाचा : Laxman Hake : “मिस्टर संभाजी भोसले, मी आता तुम्हाला राजा म्हणणार नाही”, लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

गणेशोत्सव काळात मुंबई पुण्यातील चाकरमानी चिपळूणला येताना कुंभार्ली घाट मार्गे येत होते. त्यांची गैरसोय टाळावी यासाठी कुंभार्ली घाटातील खड्डे दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांसह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर किमान चिपळूण कराड मार्गावरील बहादूर शेख नाका ते पोफळी आणि पोफळी ते घाटमाता या दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती होईल अशी अपेक्षा नागरिकांना तसेच या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना होती. नियोजित वेळेनुसार शरद पवार रात्री आठ वाजता चिपळूणमध्ये येणार होते ते कराड मधून वेळेत निघाले मात्र कुंभार्ली घाटात पासून प्रवास करताना त्यांना जागोजागी खड्ड्यांचा त्रास झाला. त्यामुळे तब्बल दीड तास त्यांना चिपळूणमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. घाटात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे. घाटातील खड्डे, मोऱ्या, संरक्षण भिंती, धोकादायक वळणे, कोसळलेल्या दरडी मोजायचे झाले आणि मागील पाच वर्षात त्यावर झालेल्या खर्चाचा तपशील पाहिला तर एक स्वतंत्र पुस्तिका निघेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chiplun sharad pawar on potholes in the chiplun city and kumbharli ghat css