चिपळूण: चिपळूण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या वालोपे येथील एच. पी पेट्रोल पंप याठिकाणी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या चारजणांना चिपळूण वनविभागाने सापळा रचून पकडले. या कारवाईत दोन वाहनांसह संशयित आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले. या चौघांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सीबीआयकडून गुन्हा दाखल होताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत म्हणाले…

व्हेल माशाची उलटीची तस्करी प्रकरणी प्रकाश तुकाराम इवलेकर (वय वर्षे ६०, रा वेळवी ता. दापोली), दिलीप पांडुरंग पाटील ( वय वर्षे ५०, रा वेळवी ता. दापोली), प्रविण प्रभाकर जाधव (वय वर्ष ४७ रा. मंडणगड), अनिल रामचंद्र महाडीक (वय वर्ष ४७ रा. अडखळ, मंडणगड) अशा ताब्यात घेतलेल्या चार जणांची नावे आहेत. संशयित आरोपींकडून व्हेल माशाची २.८९२ किलो ग्राम उलटी व शाईन गाडी (क्रमांक एमएच ०८/९-३४६९) तसेच अँक्टिव्हा गाडी (क्रमांक एमएच-०८ बीबी १०८४) जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींच्या विरुध्द वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वनरक्षक कोळकेवाडी यांच्याकडील प्र.गु.रि. ०२/२०२४, दि.०३/०९/२०२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गुह्या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.