दापोली: तालुक्यातील आंजर्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा गाण्यात एकेरी उल्लेख करुन टिंगलटवाळी केल्याच्या कारणावरुन काही जणांकडून माफीनामा लिहून घेऊन तोंडाला काळे फासल्याची घटना बुधवारी घडली.

आंजर्ले येथील काहीजण फिरण्यासाठी दीपस्तंभानजीक गेले होते. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख असलेले टिंगलटवाळीचे गाणे म्हणण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार समाजमाध्यमांवर व्हायरल होताच मंगळवारी गावात स्थानिक तरुणांनी बैठक घेतली. या बैठकीत संबंधित तरुणांनी माफी मागितली. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तेथेच येऊन माफी मागण्याचे ठरले. त्यानुसार बुधवारी हे सर्वजण तेथे माफी मागण्यासाठी पोहोचले. मात्र संतप्त शिवप्रेमी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हेही वाचा : वीस दिवस बेशुद्ध असलेल्या चिमुकल्याला मिळाले जीवदान, वालावलकर रुग्णालयाच्या प्रयत्नांना यश

जे झाले त्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत संतप्त जमावाने संबंधित तरुणांच्या तोंडाला काळे फासले. मात्र अखेर छत्रपती शिवरायांची माफी मागितल्यानंतर विषय थांबविण्यात आला. यावेळी दापोली पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जमावाने शेकडो लोकांच्या साहाय्याने एक निवेदनही दापोली पोलिसांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांकडूनही लेखी माफीनामा घेण्यात येऊन तो पोलिसांकडे देण्यात आला.

Story img Loader