खप १५ ते २० टक्क्य़ांनी वाढला; ग्राहकांचा कल बदलला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अनिकेत साठे, नाशिक
हुडहुडी भरलेल्या वातावरणात नववर्षांचे जल्लोषात स्वागत करताना देशभरात मद्याचे लाखो प्याले रिते झाले. त्यात आघाडीवर राहिलेल्या मद्य आणि बिअरशी आरोग्यदायी पेय म्हणून नावारूपास आलेली वाईन चांगलीच स्पर्धा करू लागली आहे. २०१८ वर्षांत राज्यात तब्बल एक कोटी लिटर वाईनची निर्मिती झाली. एकटय़ा डिसेंबर महिन्यात तिचा खप गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्य़ांनी वाढला आहे.
काही वर्षांपूर्वी राज्यात वाईन उत्पादन अधिक आणि खप कमी अशी स्थिती होती. आता हे चित्र बदलले आहे. एरवी मद्य, बीअर यांच्या वाटय़ाला न पिणाऱ्यांकडून तिरस्कार ठरलेला असतो. वाईनकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. ‘कौटुंबिक पेय’ म्हणून तिच्याकडे आधिक्याने पाहिले जात असल्याचे वाईनरीज्मध्ये सहकुटुंब भेटी देणाऱ्यांच्या संख्येवरून दिसते. नववर्षांच्या स्वागत सोहळ्यांतही वाईनने वरचष्मा राखल्याचे उत्पादक सांगतात. अनेक सोहळ्यात तर जादा अल्कोहोल असणाऱ्या मद्याऐवजी केवळ वाईन, बीअरचा पर्याय ठेवला गेला. बीअरला शह देण्याकरिता उत्पादकांनी बाजारात आणलेल्या फेसाळयुक्त ‘काबरेनेटेड’ वाईनच्या नव्या प्रकाराला युवा वर्गाकडून मोठी पसंती मिळाल्याचे भारतीय वाईन उत्पादक संघटनेचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितले. तिची किंमत बिअरच्या किमतीशी समकक्ष आहे.
वाईन उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २०१८ च्या हंगामात १६ ते १८ हजार टन द्राक्षांवर प्रक्रिया होऊन तब्बल एक कोटी लिटर वाईन तयार करण्यात आली. २०१९ या वर्षांत २० ते २२ हजार टन द्राक्षांवर प्रक्रिया करून राज्यात सुमारे सव्वा ते दीड कोटी लिटर वाईनची निर्मिती होणार आहे. वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्षांना या हंगामात ४० ते ६० रुपये किलो भाव मिळण्याचा अंदाज आहे.
थोडा इतिहास..
दोन दशकांपूर्वी राज्यात वाईन उद्योगाने मुहूर्तमेढ रोवली. अनेक चढ-उतारानंतर हा उद्योग आता विस्तारत आहे. काही वर्षांपूर्वी मंदीच्या तडाख्यात काही वाईनरीज् बंद पडल्या.
सद्यस्थितीत देशाची वाईन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकसह सांगली आणि आसपासच्या परिसरात सध्या ५० हून अधिक वाईनरीज् कार्यरत आहेत. प्रारंभी केवळ राज्यापुरती सिमित असणारी वाईन विक्री नंतर देशातील बहुतांश भागात पोहोचली. मागणी वाढत असल्याने द्राक्षांचे उत्पादन कमी पडेल असा संघटनेचा अंदाज आहे.
बदलते चित्र..
ग्राहकांना रेड, व्हाईट, स्पार्कलिंग, रोझे आदी १० ते १५ प्रकारांमधून निवड करता येते. मद्याच्या तुलनेत वाईन सेवन आरोग्यदायी, प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने अलीकडच्या काळात तिचा खप वाढत आहे. काही वर्षांपूर्वी वाईनचे उत्पादक अधिक आणि खप कमी अशी अवस्था होती. आज उत्पादन आणि पुरवठा यात समतोल साधला गेला आहे. जगात वाईनचे सुमारे २०० प्रकार आहेत. भारत उष्णकटिबंधीय देश असून या वातावरणात ज्या वाणांचे उत्पादन घेता येते, त्या द्राक्षांपासून वाईनची निर्मिती देशात आणि मुख्यत्वे राज्यात होत आहे.
सध्या सणोत्सवाचे वातावरण आहे. अनेक पार्टीज्, सोहळ्यांमध्ये मद्याऐवजी केवळ वाईन आणि बिअरचा आस्वाद घेण्याची व्यवस्था केली जाते. आरोग्यदायी पेय म्हणून वाईनकडे कल वाढत आहे. डिसेंबर महिन्याचा विचार केल्यास गत वर्षीच्या तुलनेत वाईनच्या विक्रीत १५ ते २० टक्के वाढ झाली. थंडगार वातावरणात ग्राहक रेड वाईन तर उन्हाळ्यात व्हाईट वाईनला प्राधान्य देतात.
– मोनित ढवळे , वरिष्ठ उपाध्यक्ष, सुला वाइनरीज्