धाराशिव : अत्याचारपीडित, मतिमंद मुलींच्या शिक्षण, पालनपोषणाची जबाबदारी घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसेच अत्याचारपीडितांच्या पालकांना येणार्या अडचणीत मदत करणार्या आळणी येथील तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहाला राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास आयुक्तालय आणि युनिसेफ यांच्यावतीने राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बालकांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात महिला व बालविकासमंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅड. सुसिबेन शहा, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने सचिव शहाजी चव्हाण, प्रकल्प संचालक गुरूनाथ थोडसरे, मानसोपचारतज्ञ रूपाली कांबळे, शिक्षिका वैशाली पोफळे यांनी राज्य शासनाचा बालस्नेही पुरस्कार स्वीकारला.
हेही वाचा : “आम्ही पोळी शेकायला तयारच असतो, आम्हा राजकारण्यांची जातच…”, बच्चू कडूंच्या विधानाची चर्चा!
या कामांची सरकारकडून दखल
लैंगिक शोषणास बळी पडलेल्या अत्याचापीडितग्रस्त मतिमंद मुलींसाठी तुळजाई प्रतिष्ठान पानगाव संचलित स्वआधार मतिमंद मुलीचे बालगृह ही संस्था कार्य करते. समाजातील एचआयव्हीबाधीत मुला-मुलींना देखील त्यांचे आयुष्य इतरांप्रमाणेच चांगले जगता यावे, हा विचार करून संस्थेने एचआयव्ही बाधीत मुलींचे लग्न करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत केली. पाणीटंचाई काळात झाडे जगविण्यासाठी पाण्याची बचत हाच पर्याय हा संदेश समोर ठेवून विदयार्थ्यांनी प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ अंघोळ करून झाडे जगविण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी संस्थेतील मुकबधीर विदयार्थ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. मतिमंद मुलींसाठी रोपवाटीकेचा प्रकल्प, त्यामध्ये औषधी वनस्पतींची लागवड, बियांपासून रोपे तयार करणे, कलम करणे यांचे प्रशिक्षण मुलींना दिले जाते.
हेही वाचा : “आम्ही पोळी शेकायला तयारच असतो, आम्हा राजकारण्यांची जातच…”, बच्चू कडूंच्या विधानाची चर्चा!
पार्लरचे प्रशिक्षण, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये बालगृहातील मुलींनी जिल्हास्तरावरून ते राज्यस्तरापर्यत सुवर्णपदक पटकावून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच बालगृहातील बर्याच मुली गाणे म्हणण्यामध्ये कुशल झालेल्या आहेत. त्यातील काही मुली हार्मोनियमसारखे वाद्य वाजवतात. मराठवाड्यामध्ये अनाथ मतिमंद मुलींसाठी काम करणारी ही एकमेव संस्था आहे. बालगृहामध्ये तीव्र, अति तीव्र मतीमंद प्रवर्गातील तसेच बहुविकलांग, वेड रिडन असलेल्या मुलींचे संगोपन शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे कार्य संस्था अविरतपणे करत आहे. तसेच त्यांची सेवासुश्रुषा करुन त्यांचे दैनंदिन कौशल्य विकसित करण्याचे कार्य संस्था करत आहे.