धाराशिव : खास थायलंडहुन मागविण्यात आलेल्या ‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अ‍ॅन्थुरियम’ फुलांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि परिसर गंधाळून निघाला आहे. एक टन फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे जगन्माता जगदंबेचा दरबार फुलून आला आहे. ३० कलाकारांनी सलग तीन दिवस काम करून तुळजाभवानी देवीचे महाद्वार, सिंहगाभारा, जिजाऊ महाद्वार आणि उपदेवतांची मंदिरे आकर्षक पध्दतीने सजवली आहेत. महाद्वारासमोरल फुलात साकारलेला गरुड मारुती रथ भाविकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील १३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील ज्ञानेश्वर पाचुंदकर सेवा म्हणून तुळजाभवानी देवीच्या चरणी फुलांची आरास सादर करतात. तुळजाभवानी मंदिराप्रमाणेच विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर, आळंदीचे संत ज्ञानेश्वर मंदिर, जेजुरीचा खंडोबा, कोल्हापुरची अंबाबाई आणि रांजणगावच्या महागणपतीलाही दरवर्षी पाचुंदकर परिवाराकडून फुलांची आरास केली जाते. तुळजाभवानी देवी मंदिरात फुलांची सजावट करण्याचे त्यांचे हे तेरावे वर्ष आहे.

हेही वाचा : आंजर्लेत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले

पुणे येथील कुमार शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ३० सप्टेंबरपासून फुलांची सजावट करण्यास सुरूवात केली. महाद्वार आणि जिजाऊ द्वाराचे तोरण, यज्ञमंंडपाला आकर्षक पध्दतीने बांधण्यात आलेले फुलतोरण, त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात असलेल्या उपदेवतांची सजावट, दगडी देवळ्यांना फुलांची माळांनी दिलेले अनोखे रूप, चांदी दरवाजा, सिंह दरवाजा, मुख्य गाभारा आणि पिंपळ पारावर केलेली लक्षवेधी सजावट येणार्‍या प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधून घेत आहे.

या फुलांचा करण्यात आला आकर्षक वापर

थायलंड येथून व्हाईट ऑर्चिड फुलांचे दहा बंच आणि अ‍ॅन्थुरियमचे ५०० बंच मागविण्यात आले. या प्रत्येक बंचची किंमत हजार रुपयांहून अधिक आहे. त्याव्यतिरिक्त शेवंती, झेंडू, अश्टर, जरबेरा, गुलाब, ग्लॅडिओस, जिप्सो आणि अशोकाचा पाला अशा एक हजार किलो सुट्या फुलांचा या सजावटीसाठी वापर करण्यात आला असल्याची माहिती कुमार शिंदे यांनी दिली.

हेही वाचा : आई राजा उदोऽऽ उदोऽऽ घटस्थापनेने तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ

आई वडिलांच्या श्रद्धेपोटी जगदंबेची सेवा

आई-वडिलांच्या श्रध्देपोटी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची आपण या सुगंधी फुलांच्या माध्यमातून दरवर्षी सेवा करीत असल्याची माहिती ज्ञानेश्वर पाचुंदकर यांनी दिली. पुणे येथे मोठे उद्योजक असलेल्या पाचुंदकरांच्या केमिकल आणि फार्मा कंपन्या आहेत. त्याचबरोबर ८०० खासगी बसचे ते मालक आहेत. दरवर्षी पंढरपूर, आळंदी, जेजुरी, कोल्हापूर, रांजणगाव आणि तुळजापूर आदी तीर्थक्षेत्री फुलांची आरास मांडण्याकरिता दरवर्षी ३० ते ३५ लाख रूपयांचा खर्च मोठ्या आनंदाने करीत असल्याचे त्यांनी सांगितले.