गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी पोलिसांच्या झालेल्या चकमकीमध्ये चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या सीमेवरील घनदाट जंगलात पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक उडाली. 
भामरागड तालुक्यातील भटपार गावामध्ये बुधवारी रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांवर नक्षलवाद्यांनी सुरुवातीला गोळीबार करण्यास सुरूवात केली. या गोळीबाराला पोलिसांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये चार नक्षलवादी ठार झाले. चकमकीत एकूण सात नक्षलवादी ठार झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चार जणांचे मृतदेह पोलिसांना मिळाले आहेत. अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल श्रीरामे यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, नक्षलवाद्यांबरोबर उडालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी या भागातील गस्त वाढविली आहे.
(संग्रहित छायाचित्र) 

Story img Loader