हिंगोली – परीक्षार्थी विद्यार्थ्याचा मोबाईल फोन परत करण्यासाठी पाच हजार रुपये मागितल्याच्या आरोपाच्या तक्रारीनंतर प्राचार्य व व खासगी व्यक्तीला हिंगाेलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी पकडले. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाब तुकाराम गव्हाणे (वय ४९) व गोपाल विठ्ठल कोंगे (३२), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पंजाब गव्हाणे हे हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथील स्व. राधाताई मुसळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थेचे संस्थापक आहेत. तर गोपाल कोंगे हे खासगी व्यक्ती आहेत. स्व. राधाताई मुसळे ज्युनिअर महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेदरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी तक्रारदाराचा मुलगा मोबाईल फोन घेऊन गेला होता. परीक्षेवेळी मोबाईल फोन जमा करण्याच्या सूचनेनुसार विद्यार्थ्याने मोबाईल फोन जमा कला. मात्र, दुसऱ्या दिवशी माेबाईल फोन परत करण्यासाठी तक्रारदार यातील पंजाब गव्हाणे यांना भेटला असता त्यांनी पाच हजारांची मागणी केली. चार हजार रुपये मागणी करून ती रक्कम स्वीकारल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांच्या पथकाने सापळा रचून प्राचार्य पंजाब गव्हाणे व खासगी व्यक्तीस चार हजार रुपये स्वीकारताना पकडले.