कराड: पूर्व वैमनस्यातून एकावर गोळीबार झाल्याची घटना कराडचे उपनगर असलेल्या सैदापूर येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याची सुमारास घडली आहे. त्यामध्ये एक व्यक्ती व त्याची लहान मुलगी जखमी झाली असून लहान मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या पाठीमागील ओम कॉलनीमध्ये सुरेश काळे यांनी वैमनस्यातून किरकोळ कारणावरून चिडून जाऊन एकावर गोळीबार केला. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याचे दरम्यान ही घटना घडली. यामध्ये एका व्यक्तीच्या हाताला घासून गोळी गेली असून ती गोळी त्याच्या १० वर्षीय लहान मुलीच्या हातात घुसून ती जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : सावंतवाडी : पारपोली जंगलात बंदुक हाताळणी करताना बार उडाला, एकजण जखमी; पोलिस कारवाई सुरू

दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी तात्काळ पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर यांच्यासह पोलीस फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या सुरेश काळे याला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad 10 year old girl injured in firing css