कराड : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमधील त्यांच्या समाधीस्थळी श्रध्दांजली वाहण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे कर्जत- जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हे समोरसमोर आले असता, नेहमीच्या शैलीत बोलताना ‘‘ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असतीतर तुझ काही खरं नव्हत’’ अशी मिश्कीलपणे फिरकी घेत अजित पवारांनी ‘‘काकांचे दर्शन घे’’ असे म्हणताच रोहित पवारांनी त्यांचे चरणस्पर्श केले. आणि बारामतीचे पवार कुटुंब राजकीयदृष्ट्या एकच असल्याचे सूर व त्याचे पडसाद राज्यभर उमटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृष्णा– कोयनेच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात आज सोमवारी सकाळी मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातील अजितदादा अन् रोहित पवारांची दिलखुलास भेट उपस्थितांना आव्वाक करणारी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आणि विधानसभेच्या निकालानंतर बारामतीच्या काका- पुतण्याच्या या अचानक घडलेल्या भेटीने राजकीय वर्तुळाच्या भुवया ताणल्या गेल्या, माध्यमांना खुमासदार वेगळा विषय मिळाला. कारण या वेळी अजित पवारांनी कर्जत- जामखेड मतदारसंघात माझी सभा न झाल्याने अल्प मताधीक्यातील पुतण्या रोहितला त्याचा नामी फायदा झाला. एका अंगाने ही राजकीय मदतच झाल्याची चर्चा सुरु झाल्याचे सूचित केले. यावर कर्जत- जामखेडचे केवळ १,२४३ मतांनी पराभूत झालेले ‘महायुती’चे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी काका- पुतण्याच्या कटाचा मी बळी ठरल्याचा आरोप केला. तर, या साऱ्या घटनाक्रमाने राज्यभर खळबळ उडवून दिली आहे.

हेही वाचा : Aaditya Thackeray : विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आदित्य ठाकरेंवर सोपविली महत्त्वाची जबाबदारी!

दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले, ते माझे काका आहेत म्हणून मी पाया पडलो, विचारांमध्ये भिन्नता आत्ता तरी आहे. शेवटी जी काही संस्कृती आहे, वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या गेल्या २०१९ च्या निवडणुकीत मला त्यांची खूप मदत केली होती आणि त्याअनुषंगाने तसेच ते माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही माझी जबाबदारी आहे. तसेच हे यशवंतराव चव्हाणसाहेबांचे स्मृतीस्थळ आहे, तरी इथे कुठला भेदभाव करून चालत नाही, इथे संस्कृती पाळणे फार महत्त्वाचे आहे, आम्ही तरी अशी संस्कृती पाळतो आणि ते मी केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : “रोहित पवार अजित पवारांचे पाय धरून म्हणालेले, काका माझ्या…”, मिटकरींचा टोला; म्हणाले, “खोटारडा आज मस्तीत…”

माझ्या कर्जत- जामखेड मतदारसंघात अजितदादांची सभा झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर- खाली झाले असते, उलटही होऊ शकले असते. पण, बारामतीमध्ये ते अडकून पडले होते. त्यांना माझ्या मतदारसंघात येता आले नाही. शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. पार्टी म्हणून पाहिले तर, आज सगळ्यात जास्त आमदार हे त्यांचे निवडून आलेत, ही चांगली गोष्ट आहे मी त्यांचे अभिनंदन सुद्धा केलेले आहे असे रोहित पवार यांनी शेवटी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In karad ajit pawar rohit pawar meet after vidhan sabha result 2024 css