कराड : पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना पाणलोटक्षेत्रात सलग नऊ दिवस सुरु असलेली कोसळधार आणि हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असतानाच शिवसागर जलाशयाचे सहा वक्री दरवाजे सायंकाळी चार वाजता दीड फुटानी उघडून १० हजार क्युसेक पाण्याचा जलविसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे. तर, कण्हेर धरणातून दुपारी १२ वाजता पाच हजार क्युसेकचा जलविसर्ग करण्यात आल्याने कृष्णा- कोयना, पंचगंगा नद्यांच्या जलपातळीत लक्षणीय वाढ होऊन या नद्यांना महापूर येण्याची भीती व्यक्त होत आहे.

महापुराची धास्ती वाढली

कोयना धरणाच्या पायथा विजगृहातून काल १,०५० क्युसेक पाण्याचा कोयना नदीत जलविसर्ग असताना त्यात आता आणखी १० हजार क्यूसेक पाण्याची भर पडणार असल्याने कृष्णा, कोयना आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. सांगली, कोल्हापूरला महापुराची तर, कोयनाकाठी पुराची धास्ती वाढली असून, सलग जोरधारेने पडझड, रस्ते खचणे, बंधारेही वाहून गेल्याने समाजमन सुन्न झाले आहे.

Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात

हेही वाचा : Pune Rain Update: “…म्हणून पुण्यात पाणीच पाणी झालं”, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; अडकलेल्या नागरिकांसाठी ‘एअरलिफ्ट’ची तयारी!

कोयनेचा जलसाठा ७५ टक्के

शिवसागर जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने वाढताना सध्या तो ७७ टीएमसीच्या घरात (७५ टक्के) पोहचला असल्याने धरण परिचालन सूचीनुसार धरणाचा किती तारखेला किती पाणीसाठा असावा हे निश्चित असल्याने या सूचीप्रमाणे धरणातून जलविसर्ग करणे अपरिहार्य आहे. त्यानुसार आज गुरुवारी सायंकाळी चार वाजता कोयना शिवसागराचे सर्व सहाही दरवाजे दीड फुटाने उघडून जलविसर्ग करण्यात येणार आहे. तरी कृष्णा, कोयना व पंचगंगा या नद्यांकाठी दक्षतेच्या सुचना जारी झाल्या आहेत.

मंत्री शंभुराजेंकडून निवेदन

नद्यांना पूर आला असताना दुसरीकडे पावसाचे जोर कायम असल्याने शासकीय खबरदारीच्या उपाययोजनांसाठी कामाला लागली आहे. याबाबत सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सविस्तर निवेदन करून, लोकांनीही आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन केले. धबधबे तसेच नद्यांकाठी जाण्यास तात्पुरती बंदी केल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा; स्वबळाचा नारा देत म्हणाले, “आपण इतक्या जागांवर…”

कोयनाकाठही धास्तावला

विशेषतः सांगली, कोल्हापूरला पुराचा फटका बसत असताना, पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग यामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांपाठोपाठ कोयना नदीकाठचे लोकही धास्तावले आहेत.

पूरप्रवण क्षेत्रात पाणी घुसले

सलग नऊ दिवस सुरु असलेल्या जोरदार पावसाने विशेषतः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्रात नद्यांचे पाणी घुसू लागल्याने या पुराच्या संकटात पावसाचा तडाखा कायम राहताना पावसाने उसंत न घेतल्यास महापुराचे आस्मानी संकट उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : “लाडका भाऊ आणि लाडकी बहीण दोघं एकत्र राहिले असते तर..”, राज ठाकरेंची टोलेबाजी

जलाशयात झपाट्याने वाढ

दरम्यान, सलग जोरधारेने पडझडीचे सत्र सुरु झाले आहे. घरे, दरडी कोसळण्यासह रस्ते खचणे, बंधारे वाहून जाणे, सखल भागात पाणीच पाणी होणे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

तर, दुसरीकडे उपयुक्त पावसाने खरीपाचा पेरा उत्कृष्ठ ठरतो आहे. नद्यांच्या पाणीपातळीत पूरसदृश्य स्थितीत आणखी झपाट्याने वाढ होताना, जलसाठे झपाट्याने वाढून अतिशय मजबूत बनले आहेत.